Next
‘पिडीलाइट’तर्फे शाळांसाठी ‘फेव्हिक्रिएट’ उपक्रम
प्रेस रिलीज
Saturday, September 15, 2018 | 02:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पिडीलाइट इंडस्ट्रीजने नुकतेच फेव्हिक्रिएट सादर केले असून, या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.

हा उपक्रम शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतीला पूरक ठरत त्याला ‘करून शिका’ या नव्या दृष्टीकोनाची जोड देत त्याद्वारे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्जनशीलतेचा समावेश करणार आहे. या उपक्रमाद्वारे मुलांना त्यांची पूर्ण क्षमता जाणून घेण्यासाठी, आत्मविश्वास विकसित करण्यासाठी, चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी व त्यातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी व्यासपीठ पुरवले जाणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या एका चर्चासत्रात ‘पिडीलाइट‘ने हा उपक्रम सादर केला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी लहान मुलांच्या आयुष्यात सर्जनशीलतेला असलेल्या महत्त्वाबद्दल आपले मत मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सेंटर फॉर सोशल बिहेव्हियर अँड चेंज कम्युनिकेशनचे संस्थापक संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक निशित कुमार यांनी नेहमीच्या शिकण्याच्या पद्धतीच्या पलीकडे जात, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उजव्या मेंदूशी संबंधित कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व नमूद केले.

शांतनू भांजासिलव्हंट अडव्हायजर्स आणि ग्यानलॅब यांनी तयार केलेल्या ‘क्रिएटिव्हिटी अँड दी इंडियन एज्युकेशन सिस्टीम’ नावाच्या अहवालात सर्वच (शंभर टक्के) कॉर्पोरेट्सनी सहभागी होत संभाव्य कर्मचारी निवडताना सर्जनशीलतेचस महत्त्व देण्याकडे आपला कल असल्याचे नमूद केले. याच अहवालात सहभागी झालेल्या ५९ टक्के पालकांनी सध्याची शिक्षण यंत्रणा मुलांच्या सर्जनशीलतेस वाव देत नसल्याचे नमूद केले. ५० टक्के पालकांनी मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत सर्जनशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने आपल्याला कोणतीच भूमिका नसते, कारण ती शाळेची जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले. म्हणूनच ९६ टक्के कॉर्पोरेट्स आणि ९४ टक्के पालकांना मुलांमध्ये सर्जनशील विचारसरणी रूजवण्यासाठी शाळेने जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.

ही पोकळी भरून काढण्यासाठी ‘पिडीलाइट’ने अभिनव कंटेंट आणि शाळांबरोबर भागिदारी करून शिस्तबद्ध आराखड्यासह मुलांमध्ये कला व कलाकुसरीचे कौशल्य विकसित करण्याचे काम हाती घेतले असून, त्यांच्यात ही कौशल्ये मजेदार व आकर्षक पद्धतीने रूजवण्यावर त्यांचा भर असेल.

‘पिडीलाइट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राहकोपयोगी उत्पादने) शांतनू भांजा म्हणाले, ‘मुलांच्या विकासात सर्जनशील विचारसरणीचा मोठा वाटा असतो, असे आम्ही मानतो. म्हणूनच या उपक्रमाद्वारे मुलांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्याचे आणि त्यांना आपल्या क्षमतेची ओळख करून घेण्यासाठी व्यासपीठ पुरवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. ‘फेव्हिक्रिएट’ हा उपक्रम तयार करून त्याद्वारे मुलांना कलात्मक कौशल्ये मांडण्यासाठी आणि त्यांची कल्पनाशक्ती विस्तारण्यासाठी वाव मिळणार आहे. त्याचबरोबर या उपक्रमाद्वारे ब्रँड आपल्या शिक्षण यंत्रणेत शिकण्याच्या नव्या पद्धतींचा समावेश करणार आहे, ज्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि उज्ज्वल भविष्याची दारे विस्तारतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search