Next
‘आयएसएचआरएई पुणे चॅप्टर’चा पदग्रहण समारंभ
प्रेस रिलीज
Thursday, April 04, 2019 | 04:15 PM
15 0 0
Share this article:पुणे : इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेटिंग एअरकंडिशनिंग इंजिनीअर्स (आयएसएचआरएई) पुणे चॅप्टरच्या नवीन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ नुकताच हॉटेल रामी ग्रँड येथे उत्साहात झाला. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित असलेल्या २५ माजी अध्यक्षांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला. देशातील तरुणांना व महिलांना या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहित करून रेफ्रिजरेटिंग एअरकंडिशनिंग या उद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्याची शपथ नवनियुक्त संचालक मंडळाने या वेळी घेतली.

‘आयएसएचआरएई’चे विभागीय संचालक (पश्चिम विभाग) केदार पत्की यांनी नवनियुक्त संचालक मंडळाला शपथ दिली. नवीन अध्यक्ष नंदकिशोर माटोडे यांनी मावळते अध्यक्ष सूरज रानडे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. विरेंद्र बोराडे (सचिव), सतीश मेनन (खजिनदार) व दीपक वाणी (प्रेसिडेंट इलेक्ट) तसेच सदस्यांनी या वेळी शपथ घेतली.

कार्यक्रमामध्ये व्होल्टास लिमिटेडमधील तज्ज्ञ जयंत देशपांडे यांचे एनव्हायरमेंटल कंट्रोल सिस्टिम अ‍ॅंड टनेल व्हेंटीलेशन सिस्टिम फॉर अंडरग्राउंड मेट्रो- अ पुणे परस्पेक्टीव्ह या तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. देशपांडे यांनी पुण्यात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाची तांत्रिक सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. विशेषत: भुयारी मेट्रोचे डिझाइन कसे केले जाते, ते करताना एअर एअरकंडिशनिंग आणि व्हेंटिलेशन सिस्टीमचे कसे डिझाइन केले जाते. टनेल कसे बनवले जातात याबाबतच्या तांत्रिक बाबींचा उहापोह केला.

या वेळी ‘आयएसएचआरएई’चे राष्ट्रीय अध्यक्ष (इलेक्ट) रिची मित्तल यांनीही मार्गदर्शन केले. ‘आयएसएचआरएई’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्रन, अमोद दीक्षित, अरविंद सुरंगे, नितीन देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी व्हीआरफ दंगल, ‘आयएसएचआरएई’च्या एसीआर ट्रेंडझ, चिलर कॉनक्लेव्ह अँड हिट पंप कार्निव्हल, या राष्ट्रीय परिषदांच्या ब्रँडिंगचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘आयएसएचआरएई’ ही राष्ट्रीय पातळीवरील शासनमान्य संस्था असून, रेफ्रिजरेटिंग एअरकंडिशनिंग या उद्योग क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान वाढविणे, तांत्रिक मानांकने तयार करणे, या उद्योग क्षेत्राला पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकाधिक सक्षम करण्यासाठी सर्वोतपरी मदत करणे, त्यासाठी संशोधन करण्यासाठी युवक-युवतींना प्रोत्साहित करणे, संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देणे अशा विविध पातळीवर काम करते.

मावळते अध्यक्ष सूरज रानडे यांनी गेल्या वर्षातील त्यांच्या कामाचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. आपल्या कारकिर्दीत ‘सेव्ह दी सोसायटी’ ही संकल्पना घेऊन २२ कार्यक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत सहभाग वाढवता येईल यादृष्टीने आमच्या टीमने काम केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ही एक हजार ३३ इतकी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनियुक्त अध्यक्ष नंदकिशोर माटोडे यांनी त्यांचा सन २०१९-२०च्या संकल्पित उपक्रमांची माहिती या वेळी दिली. या वर्षी ‘आयएसएचआरएई’ पुणे चॅप्टरची ‘सर्व्हिंग दी सोसायटी विथ न्यू एंथूझियाझम इन दी मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅंड रायझिंग स्टार चॅप्टर ऑफ आयएसएचआरएई कम्युनिटी’ ही संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. आता संस्थेच्या सदस्यांची संख्या हे ४८१ असून, ती ५७५ इतकी करू; तसेच विद्यार्थ्यांची एक हजार ३३ असलेली संख्या एक हजार १००पेक्षा जास्त करण्यासाठी आपली टीम कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search