Next
बापातलं नवं भवताल..
BOI
Sunday, May 06, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


आजही आपल्याकडे लग्न मोडणं हे फार मोठं पाप वाटतं, कारण कितीही गंभीर असलं, तरी ते मुलीला त्यात निभावून नेण्यासाठीच विनवण्या करताना दिसतात; पण इथं सुगंधाचे वडील मात्र लग्न मोडायला तयार असतात. त्यांना आपल्या मुलीचं हित आणि सुख दोन्ही महत्त्वाचं वाटत असतं. आपल्या मुलीचं वैवाहिक सुख पित्याला महत्त्वाचं वाटणं, हेच मुळी किती आश्वाासक आहे... वाचा ‘हॅशटॅग (##)कोलाज’मध्ये...
..........................................
माझी एक मैत्रीण सुगंधासाठी लग्नाचा प्रस्ताव आला. तिशीतली सुगंधा प्रोफेसर आहे, तर तिचा तो प्रस्तावित मित्र मुदित  वकिल. सुगंधा पुण्याची, तर मुदित चं मूळ गाव नाशिक; पण नोकरीच्या निमित्ताने तोही पुण्यात आहे. असं आहे, तर दोघांनी एकमेकांना भेटून घ्यावं, असं कुटुंबियांनी सुचवलं. मग दोघेही भेटले. सुगंधाने तर त्याला आधीच पाहिले होते. दिवसभर कोर्टात रेंगाळून, त्याचं दर्शन घेऊनच ती परतली होती. तिला तो खूपच आवडला होता. प्रश्नल त्याचा होता; पण त्यानंही पसंतीची मोहोर उमटवली. 

त्यानंतर दोघं दोन-तीन वेळा भेटले. एकमेकांची सोबत दोघांनाही आवडू लागली. उसना नकार दाखवत, का-कू करत दोघांनीही आपापला ग्रीन सिग्नल घरच्यांना कळवला. मुदित चं घरदार पाहण्यासाठी सुगंधाचे कुटुंबीय नाशिकला गेले. ते तिथे भेटून लग्नाच्याही गोष्टी ठरवणार होते. तशी दोघांच्या कुटुंबियांची तयारी होती. जेवणं उरकल्यानंतर मुदित च्या आजी बाहेर आल्या. त्यांना कोड फुटलेलं होतं. मुदित च्या एका काकांनाही कोड असल्याचं सुगंधाच्या कुटुंबियांना कळलं. भरपूर गप्पा, हसणं-बोलणं सुरू असलेल्या घरात आजींच्या येण्याने अचानक शांतता पसरली. सुगंधाला आणि मुदित ला घरात काय घडलं, याचा काही थांगपत्ताच नव्हता. सारं काही जुळून आलं आहे, तर पुढंही सगळं छानच घडणार, या विचारात दोघंही निवांतपणे घराबाहेरच्या पडवीत बसून भविष्य रंगवत होते. 

इकडे घरात घडलं भलतंच. सुगंधाच्या कुटुंबियांनी जागीच लग्न मोडलं. सुगंधा आणि मुदित दोघेही गोंधळले. ‘माफ करा, पण घडलं काय..? देण्या-घेण्याची काही गोष्ट असेल, तर मी  माझ्या कुटुंबियांशी बोलतो. मला तसाही त्यात रस नाही. माझा रस फक्त सुगंधात आहे.’ हे शेवटचं वाक्य अर्थात तो हळू बोलला. सुगंधानेही मुदितच्या म्हणण्याला दुजोरा दिला; पण तेव्हा सुगंधाच्या वडिलांनी मात्र तिला डोळ्यांनी गप्प केलं. एकूण परिस्थिती पाहता ती ही मग गप्प राहिली. त्यानंतर पंधरा मिनिटांत ते सगळे घराबाहेर पडले. 

घरी आल्यानंतर सुगंधाच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं आणि सांगितलं, ‘बाळ, मुदित खूप चांगला मुलगा असेल... नव्हे, आहे; पण त्याच्या आजीला कोड फुटलेलं आहे. उद्या जर मुदितलाही तसंच झालं किंवा पुढे तुमच्या मुलांमध्ये तो दोष आला तर..?’ क्षणभर सुगंधा चक्रावली; पण क्षणभरंच. ती लगेच ठामपणे म्हणाली, ‘अशी काही फालतू कारणं नका सांगू. मी मुदितशीच लग्न करणार. भविष्यात काही घडेल अशा केवळ शक्यतेसाठी मी माझ्या हातातला चांगला माणूस गमावू शकत नाही.’ तिचं बोलणं थोडं फिल्मी होतं खरं; पण तिला तो मनापासून आवडला होता आणि तिच्यासाठी त्याच्या आजीला असलेलं कोड फार महत्त्वाचं नव्हतंच. घरात भांडणं झाली. वडिलांचं चिडून, रागावून, अगदी प्रेमानं समजावूनही झालं; पण सुगंधा ऐकेनाशी झाल्यावर शेवटी वडिलांनी तिला सांगितलं की,  ‘आपण वैद्यकीय सल्ला घेऊ. कोड अनुवांशिक असतं का.?  किती टक्के..? अशी माहिती घेऊ आणि हे जर अवघड प्रकरण असेल, तर तू मुदितचा विचार डोक्यातून काढून टाकायचा.’ शेवटी सुगंधालाही आपल्या वडिलांचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. ते डॉक्टरांकडे गेले....

पुढे मुदित आणि सुगंधाचं लग्न झालं की नाही.? असा प्रश्नड पडला असेल ना.. असा प्रश्नझ पडावा, म्हणून तर इथंच थांबले. अं.. पण मला आधी सांगा, मुदित आणि सुगंधा ही नावं कुठंतरी ऐकल्यासारखी वाटत नाहीत.? ही दोन्ही नावं ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटातून घेतली आहेत. खर्याुखुर्या. गोष्टीत खरीखूरी नावं टाळायची म्हणून ही नावं निवडली; पण हीच निवडावी वाटली त्याला कारण आहे. त्याला कारणीभूत आहेत, ते माझ्या मैत्रिणीचे वडील. माझ्या मैत्रिणीचे वडील एरवी फार साधे, शिस्तबद्ध. त्यांना मुलींवर माया करता येत नाही. निवांतपणे मुलींशी संवाद करावा, मुलींच्या आग्रहास्तव सिनेमाला जावं, असं काहीही करायला त्यांना आवडत नाही; पण त्यांचं वागणं ना मला चित्रपटातल्या सुगंधाच्या वडिलांसारखं वाटलं. 

साधारणपणे आपल्याकडे मुलीचं लग्न ठरवणं ही फार मोठी जबाबदारी समजली जाते; पण ती जबाबदारी पार पाडताना कळत-नकळत आपण तिचं ओझं करून टाकतो. मग ते ओझं केवळ उतरवण्याकडे आपला कल असतो. कसंही, काहीही करून; पण इथं त्यांना स्वत:च्या मुलीचं सुख अधिक महत्त्वाचं वाटलं. ते वाटणं पितृसत्ताकतेतून नव्हतं. ‘आम्हाला वाटेल तेच तुझ्यासाठी योग्य पद्धतीचं’, असं नव्हतं त्यात खरेपणा होता. उद्या जर जावयाला कोड फुटलं, तर ही निभावू शकेल का? त्यांच्या बाळाला झालं, तर ते सारं समजून घेणं जमेल का? या साऱ्या खर्यातखुर्याे भावना होत्या. त्या वेळेस मला प्रकर्षाने चित्रपटातील सुगंधाचे वडील आठवत होते. इथं तर त्या मित्राच्या कुटुंबातील कोणा नातेवाईकाचा काहीतरी प्रॉब्लेम होता; पण चित्रपटात तर खुद्द नायकाचाच तो प्रश्न होता. त्याला एक मेडिकल प्रॉब्लेम असतो, शीघ्रपतनाचा.! मुदितचा हा प्रश्न अर्थातच सुगंधालाही कळतो. थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नाआधी हा उलगडा झालेला असतो आणि तो केवळ मुदित-सुगंधापर्यंत मर्यादित न राहता सुगंधाच्या घरातही माहित होतो. लग्न ठरलं, साखरपुडा झाला, की लग्न मोडण्याच्या कल्पनेनंच भल्या भल्यांना काटा येतो. 

आजही आपल्याकडे लग्न मोडणं हे फार मोठं पाप वाटतं, कारण कितीही गंभीर असलं, तरी ते मुलीला त्यात निभावून नेण्यासाठीच विनवण्या करताना दिसतात; पण इथं सुगंधाचे वडील मात्र लग्न मोडायला तयार असतात. त्यांना आपल्या मुलीचं हित आणि सुख दोन्ही महत्त्वाचं वाटत असतं. आपल्या मुलीचं वैवाहिक सुख पित्याला महत्त्वाचं वाटणं, हेच मुळी किती आश्वाासक आहे. अन्यथा मुलीचं लग्न लावून दिलं, की तिचा नवरा तिला पोसू शकतो, की नाही एवढाच विचार होतो. समजा तो उत्तम कमावणारा असला, तरीही जर तो बायकोची हौस मौज पुरवत नसेल तरीही, ‘कशाला उधळपट्टी हवी. काटकसरीनंच रहावं. बाकी सारं तर वेळच्या वेळेवर मिळतं ना..’, असा उपदेशपर अपराधीभाव मुलीच्याच पदरात घातला जातो. एखाद्या जोडप्याला जर मूल होत नसेल, तर अशा जोडप्यातील नवर्या त काही दोष असू शकतो याबाबत अजूनही आपल्या समाजाला विश्वा स वाटत नाही. अशा जोडप्यांपैकी प्रथमत: बायकोवरच उपचाराला सुरुवात होते. त्याच वेळेस नवरा साधा तपासणीही करायला धजत नाही. अशा सगळ्या जळमटलेल्या भवतालातला बाबा बदलतोय, हे खूप सुखद आहे.

चित्रपटातल्या सुगंधाचा बाबाच पाहा ना..! उपवर मुलगा आपल्या मुलीला वैवाहिक सुख देऊ शकेल की नाही, किंबहूना जर त्यांना मुलबाळ झालं नाही, तर त्याचा दोष आपल्या मुलीवर येईल, म्हणून तो तिला स्वत:हूनच लग्नाच्या आधी पळून जा म्हणून सल्ला देत असतो. चित्रपटात हा गंभीर विषय हलक्या, विनोदी ढंगाने मांडला आहे. त्यामुळेच कदाचित वडील या भूमिकेतला नवा दृष्टीकोन चित्रपट पाहण्याच्या नादात दुर्लक्षित करतो; पण हा बाप खरंच फार मस्त आहे. आपल्या होणाऱ्या जावयाला तो डॉक्टरांकडे नेतो. मुलीला पळून जायला सांगतो. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता लग्न मोडण्याची तयारीही ठेवतो. चित्रपटात आणखी एक मस्त दृश्य आहे. लग्नाआधीच हा सारा गदारोळ कुटुंबात माहित झाल्यानं मुलीच्या कुंडलीत दोष आहे, असं म्हणत तिचं एका झाडाबरोबर लग्न लावायचं ठरतं. तेव्हा नायकच असं झाडाबरोबरचं लग्न करतो. मुळात असं झाडा-बिडाबरोबर लग्न करणं, ही अंधश्रद्धाच; पण अशा अंधश्रद्धा पाळायलाही स्त्रीच हवी असते. नायक तिथेही छेद देतो. लग्न, फेरे तोच करतो. आपल्या होणाऱ्या पत्नीऐवजी आपण केलं तर चालेल ना, असं म्हणत ते सारं निभावतो. हे असं पारंपरिक गोष्टींना छेद देणं, पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाणं हे काही फक्त चित्रपटात घडत नव्हतं. मला ते प्रत्यक्षातही दिसत होतं. मैत्रिणीच्या निमित्ताने. 

आपल्या आसपासचा पुरूष-बाबा असा बदलत आहे. आपल्या लेकीला आर्थिक-मानसिक आणि शारीरिकही सुख-शांती लाभावी, म्हणून त्याचा जीव कासावीस होत आहे. लेकीचं लग्न ही जबाबदारी असेलही; पण ओझं नक्कीच नाही. आता माझी मैत्रीण जी तिशीतली आहे. तिच्या पालकांवर नाना तऱ्हेने कुटुंबियांचा दबाव आहे. अनेक जण समोरून वा मागून तिच्या लग्नाचा राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखी चर्चा करतात, तेव्हा तिच्या पालकांकडेच काही मुद्दे नसतात. अशा सर्व परिस्थितीतही मैत्रिणीच्या वडिलांना तिचीच अधिक काळजी वाटत होती. शांतपणे विचार केल्यावर मैत्रिणीलाही वडिलांचं म्हणणं पटलं. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. कुठल्याही प्रकारचा धोका स्पष्टपणे नव्हताच. तसंही आपलं आयुष्यंच मुळी असंख्य चकव्यांनी भरलंय तर काय..!

शेवटी इतकंच म्हणेन, चित्रपटात मुदित आणि सुगंधाचं लग्न होतं.. खऱ्या-खुऱ्या सुगंधा-मुदितचं याहून वेगळं काही होणं शक्य होतं का..?

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

(दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या ‘हॅशटॅग कोलाज’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link