Next
अण्णासाहेब किर्लोस्कर
BOI
Saturday, March 31, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

‘आधुनिक महाराष्ट्रीय नाट्याचें जनक’ म्हणून मान मिळालेले बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा ३१ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......... 
३१ मार्च १८४३ रोजी धारवाडमध्ये जन्मलेले बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर म्हणजे मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार! त्यांना कविता करण्याची आणि नाटकाची प्रचंड आवड होती आणि तरुण वयातच ‘समुद्रमंथन’, ‘विक्रमचरित्र’सारखी पदं नाटक मंडळींना रचून देण्याचं काम ते करत होते.

साधारणपणे २३ वर्षांचे असताना त्यांनी ‘भरतशास्त्रोत्तेजक’ नावाने नाटक कंपनी काढून नाटकं करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे वयाच्या तिशीत, शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर त्यांनी १८७३ साली ‘शांकरदिग्जय’ हे पहिलं नाटक लिहिलं. 

पुढल्या सात वर्षांतच, १८८० साली, त्यांनी कालिदासाच्या नाटकाचं भाषांतर करून, मोरोबा वाघोलीकर, बाळकोबा नाटेकर, नाना शेवडे यांच्यासारख्या मंडळींना हाताशी धरून, स्वरचित पदं घालून ‘शाकुंतल’ हे चार अंकी नाटक रंगभूमीवर आणलं. ते अफाट लोकप्रिय झालं. प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी नाट्यगृहाकडे वळू लागल्या. 

पुढे त्यांनी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ची स्थापना केली. लगोलग १८८२ साली ‘संगीत सौभद्र’ हे स्वतंत्र संगीत नाटक लिहून रंगभूमीवर आणलं आणि त्या नाटकाने तर इतिहासच घडवला. सुविहित कथानक, नैसर्गिक संवाद, आकर्षक व्यक्तिरेखा, सुंदर मधुर पदं आणि उपरोधात्मक विनोदाची पेरणी अशा वैशिष्ट्यांमुळे या नाटकाची मोहिनी आज १४० वर्षं उलटली तरी कायम आहे, आजही याचे प्रयोग होत असतात. 

अण्णासाहेब स्वतः चांगले नट व दिग्दर्शक होते. महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग त्यांनी निर्माण केले. इतकंच नव्हे, तर उत्तम संगीत नाटके कशी असावीत, याचा आदर्श घालून दिला. नाटक कंपन्या आणि नाटकात काम करणारी नटमंडळी यांना त्यांच्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळायला सुरुवात झाली.

अण्णांसाहेबांनी नाटक कंपनीची राहणी भिकार न ठेवता एखाद्या संस्थानाप्रमाणे तिचा खर्च चालविला होता. तीच पद्धत पुढच्या काळात मोठमोठ्या कंपन्यांतून दृष्टीस पडत होती. १९१३पर्यंत बालगंधर्वांमुळे किर्लोस्कर नाटक कंपनी पहिल्या दर्जाची नाटक कंपनी म्हणून दिमाखात मिरवत होती. 

दोन नोव्हेंबर १८८५ रोजी त्यांचं गुर्लहोसूरमध्ये निधन झालं.

(ज्येष्ठ गायक कलावंत डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी सादर केलेल्या, अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ नाटकामधील ‘राधाधरमधुमिलिंद जय जय’ या गीताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. हे गीत आणि त्याचे संगीतही अण्णासाहेबांचेच आहे.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 142 Days ago
Valueable contribution to history .
0
0

Select Language
Share Link
 
Search