Next
यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये अवयवदान दिनानिमित्त कार्यक्रम
BOI
Friday, August 30, 2019 | 02:18 PM
15 0 0
Share this article:

मनोगत व्यक्त करताना सुरेंद्र तथा बाळ माने

रत्नागिरी :
‘देशात अवयवदान चळवळीला गती मिळणे आवश्यक आहे. याकरिता डॉक्टरांबरोबरच नर्सिंग शिकणाऱ्या व कार्यरत असलेल्या नर्सेसनीही जनजागृती केली पाहिजे. त्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरापासून सुरुवात करून देशभरात गरजूंना अवयव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करायला हवेत. अवयवदान करू इच्छिणाऱ्यांची नावनोंदणी करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीतील दी यश फाउंडेशनच्या ‘कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी केले.

दीपप्रज्ज्वलन करताना डॉ. शिवदीप कीर. शेजारी बाळ माने, डॉ. देवांगमठ, सौ. लाड, प्रा. रमेश बंडगर, प्रा. चेतन अंबुपे आदी.

अवयवदान दिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बाळ माने म्हणाले, ‘प्रत्येक गोष्ट सरकारने दिली पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा असते. सरकार कल्याणकारी हवेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार नवनवे उपक्रम राबवत आहे; पण लोकांनीही आपापले कर्तव्य पार पाडले पाहिजे. स्वच्छ भारत योजना, पाच लाख रुपये विम्याची आयुष्मान भारत योजना सुरू आहे. ‘फिटनेस’साठी विशेष योजनाही सुरू झाली आहे. आरोग्य व्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचायला हवी. अवयवदानाचे महत्त्व व त्या संबंधातील लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृतीचे प्रयत्न केले पाहिजेत.’प्रमुख पाहुणे डॉ. शिवदीप कीर म्हणाले, ‘एखादा अवयव दिला, की पुढच्या जन्मात तो अवयव मिळत नाही, अशी अंधश्रद्धा ग्रामीण भागात असते. त्यामुळे अवयवदान केले जात नाही. अन्य देशांच्या तुलनेत भारत अवयवदानात मागे आहे. त्यामुळे अनेक जण गरजू रुग्णांना वाट पाहावी लागते. परंतु ही परिस्थिती नक्कीच बदलेल.’

रमेश बंडगर यांनी अवयवदानाविषयी मनोगत व्यक्त केले. रजिस्ट्रार शलाका लाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्या डॉ. मीनाक्षी देवांगमठ यांनी अवयवदानदिनाचे महत्त्व सांगितले. 

अवयवदान दिनानिमित्त कॉलेजमध्ये रंगावली व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. हसीना हमदुले हिने सूत्रसंचालन व भाविका शिंदे हिने स्वागत आणि प्रास्ताविक केले. काश्मिरी रासम हिने आभार मानले.  

अवयवदानासंबंधी अधिक माहितीसाठी हेही जरूर वाचा :

पुनर्जन्माचं तेज देणारी ‘आरती’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sarika salunkhe About 21 Days ago
Good job
0
0

Select Language
Share Link
 
Search