Next
रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this story

रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन करताना डावीकडून डॉ. शैलेश पालेकर, डॉ. रोहिणी डांगे, अमृता देवगावकर, गणेश जाधव, मठकर

पुणे : मज्जासंस्थेशी निगडीत अर्धांगवायू आणि इतर आजारांवर उपचार आणि रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरची स्थापना हडपसर येथील सहयाद्री हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.

या सेंटरचे उद्घाटन १९ जानेवारी २०१९ रोजी सकाळी झाले. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनने यासाठी पुढाकार घेतला असून, त्यासाठी ४० लाख रुपये खर्चून अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. यामुळे बायोडेक्स बॅलन्स सिस्टीम, बायोडेक्स सीट टू स्टँड ट्रेनर, पाब्लो सिस्टीम, इन्फ्रारेड लेझर थेरपी, मॅट्रीक्स ऱ्हिदम थेरपी, लिव्हा को-ऑर्डिनेशन डायनॉमिक थेरपी मशीन अशी उपचार सामग्री पुण्यात प्रथमच उपलब्ध झाली आहे. या सुविधा रुग्णांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

‘रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१’चे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले. माजी प्रांतपाल अभय गाडगीळ, सह्याद्री हॉस्पिटल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त आपटे, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या अध्यक्ष अमृता देवगावकर, माजी अध्यक्ष गणेश जाधव, गिरीश मठकर, डॉ. डांगे उपस्थित होते. ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’, ‘३८००’, रोटरी क्लब आकुर्डी, रोटरी क्लब पाषाण, रोटरी क्लब लक्ष्मी रोड यांनी या प्रकल्पात ग्लोबल ग्रांट पार्टनर म्हणून सहकार्य केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link