Next
‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ पुस्तक संचाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, November 13, 2017 | 04:13 PM
15 0 0
Share this article:

‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ पुस्तक संचाचे प्रकाशन  करताना सुमित्रा महाजन,. शेजारी मुक्ता टिळक, निवेदिता भिडे, अभय बापट, सुधीर जोगळेकर, प्रकाश पाठक, डॉ. सुरुची पांडे, मृणालिनी चितळे, आदिती जोगळेकर-हर्डीकर आदी मान्यवर.पुणे : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे ‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ पुस्तक संचाचे प्रकाशन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले.

स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या भगिनी निवेदिता यांच्या ऑक्टोबर २०१७पासून १५०व्या जयंती वर्षास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त या पुस्तक संचातील चार पुस्तकांचे प्रकाशन केंद्रातर्फे करण्यात आले.

हा कार्यक्रम ११ नोव्हेंबर रोजी केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृहात झाला. या प्रसंगी व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे, अभय बापट, सुधीर जोगळेकर, प्रकाश पाठक, डॉ. सुरुची पांडे, मृणालिनी चितळे, आदिती जोगळेकर-हर्डीकर, श्रावण हर्डीकर, यशवंत लेले, ज्ञानप्रबोधिनी संचालक डॉ. गिरीश बापट, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘भारतीय मूल्यविचार’, ‘शिक्षण विचार’, ‘स्वातंत्र्यलढा-सहभाग आणि चिंतन’ आणि ‘कला आणि राष्ट्रविचार’ :  या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ८०० पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तक संचाचे मूल्य ७०० रुपये आहे.

महाजन म्हणाल्या, ‘स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे भारतीय गुरू-शिष्य परंपरेचे श्रेष्ठ प्रतिक होते. गुरूची आचारसंहिता स्वामी विवेकानंदांकडे पाहून कळते, तर शिष्य कसा असावा हे भगिनी निवेदिता यांच्या समर्पित व्यक्तिमत्त्वाकडे पाहून कळते. या देशात बाहेरून आल्यावर त्या देशाशी, देशाच्या मूल्यांशी त्या एकरूप झाल्या. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या सहभागापासून शिक्षण, कला विचारापर्यंत त्यांचे पैलू एकमेवाद्वितिय आहेत. त्यांच्या राष्ट्र विचाराची ज्योत प्रत्येकाच्या हदयाला भिडून पुढे काम करण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.’

महापौर टिळक म्हणाल्या, ‘भगिनी निवेदिता यांचे समर्पण श्रेष्ठ असून त्यांचे चौफेर विचार पुस्तकरूपाने आले हे मोलाचे कार्य आहे.’

या प्रसंगी विवेकानंद केंद्राच्या भिडे तसेच लेखिका चितळे, पांडे, हर्डीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search