Next
अंध विद्यार्थ्यांना ओरिगामी हस्तकला व ड्रम प्रशिक्षण
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ‘बीएनसीए’तर्फे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, November 30, 2018 | 03:08 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून येत्या चार डिसेंबरला भोसरी येथील अंध विद्यार्थ्यांना ओरिगामी हस्तकला व ड्रम वाजवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) युनिव्हर्सल डिझाइन सेंटर, तसेच डिझाइन ब्रिज फाउंडेशनतर्फे आयोजित केला आहे.

‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, प्रा. कविता मुरुगकर, अभिजित मुरुगकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५० विद्यार्थिनीं हा उपक्रम राबवताना अंध विद्यार्थ्यांना सहकार्य करणार आहेत. यासाठी भोसरी येथील पटाशीबाई रतनचंद मानवकल्याण ट्रस्टची अंधशाळेतील ८० विद्यार्थी निवडण्यात आले आहे. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे प्रा. मुरुगकर यांनी सांगितले.

‘या दिवशी ओरिगामी हस्तकला शिकवण्यासाठी त्यातील तज्ज्ञ आर्किटेक्ट बोबी विजयकर, तसेच ड्रम वाजवण्यासाठी त्रक धूम अ‍ॅकॅडमीचे नितीन सातव व त्यांचे सहकारी प्रशिक्षण देणार आहेत. या दोन्हीही कला शिकत असताना त्याचा मनमुराद आनंदही ही अंध मुले घेतील,’ असा विश्‍वास प्रा. मुरुगकर यांनी व्यक्त केला.

यापूर्वीही ‘बीएनसीए’तर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याचे उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत १०० अंधांना स्पर्शज्ञानातून मार्गक्रमणा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले; तसेच मिरॅकल ऑन व्हिल्स हा  दिव्यांगांनी व्हिलचेअरचा वापर करून सादर केलेला चित्तथरारक कार्यक्रमही सादर करण्यात आल्याचे प्रा. मुरुगकर यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. कविता मुरुगकर- ९७६७४ ३९९४७, प्रा. अभिजित मुरुगकर- ९२२६३ ६०२३८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search