Next
भांद्री गावात पाणी पुरवठा उपक्रमाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, October 27, 2018 | 05:43 PM
15 0 0
Share this storyअमरावती : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड आणि वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्‍ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यातील भांद्री गावात ‘भांद्री पाणी पुरवठा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन अमरावतीचे उप विभागीय दंडाधिकारी राहुल कर्दिले यांच्या हस्ते आणि ‘कोलगेट’चे व्यवस्थापकीय संचालक इसाम बचलानी यांच्या उपस्थितीत झाले.

या वेळी बोलताना ‘कोलगेट’चे व्यवस्थापकीय संचालक बचलानी म्हणाले, ‘भांद्री गावात जल उपक्रम सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ‘वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट’ या संस्थेच्या सहकार्याने अमरावती जिल्ह्यातील मागील वर्षी सुरू झालेल्या पाणी प्रकल्पाला या निमित्ताने चालना मिळाली आहे. भांद्री गावातील ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याच्या दृष्टीने हे एक छोटे, पण महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परस्पर सहकार्याने समाजात राहणे आणि एक पर्यावरणवादी अशी जीवनशैली अंगीकारून मानवी आयुष्य समृद्ध करणे ही ‘कोलगेट’ची विचारसरणी आहे.’

भांद्री हे एक ८४ घरांचे, एक जिल्हा परिषद शाळा आणि एक अंगणवाडी शाळा असलेले गाव असून, हे गाव पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करते. रोजच्या वापराच्या पाण्यासाठी वाहतूक सुविधेचाही प्रश्न या गावासमोर आहे. दोन सामाजिक तत्वावर चालवलेले सौरऊर्जेवर चालणारे पंप आणि गावापासून ७०० मीटर अंतरावर असलेली एक उघडी विहीर हे या गावातील एकमेव पाणी पुरवठ्याचे मार्ग आहेत.

फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाईमुळे या गावातील स्त्रिया व मुलींना रोजच्या पाण्यासाठी चार फेऱ्या माराव्या लागतात; मात्र आता ‘कोलगेट’ने दिलेल्या निधीतून आणि इतर शासकीय निधीतून ‘वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट’ने २० हजार लिटर क्षमतेच्या जमिनीखालील पाणी संचयाद्वारे हा प्रश्न काही प्रमाणात सोडवला आहे. शिवाय शाळकरी मुलांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आणि हात धुण्यासाठी  सुविधा निर्माण केली गेली आहे. शाळेत एक पाणी आणि स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने पाण्याचा काटकसरीने वापर आणि स्वच्छता यांच्या बाबतीतही समुपदेशन सुरू आहे.पाणीसाठा, पुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य (वॉश प्रोग्राम), पावसाच्या पाण्याची व्यवस्था आणि साठा आदी समाजाभिमुख कार्ये राबवण्याच्या हेतूने ‘वॉटर फॉर पीपल’ आणि ‘कोलगेट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमरावती पाणी प्रकल्प’ २०१७ साली सुरू झाला. सुमारे ३६ गावांपर्यंत पोचून २० पाणीपुरवठा प्रकल्प सुरू करणे, ३६ शाळांमध्ये आणि सहा आश्रम शाळांमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था पोचवणे ही या प्रकल्पाची ध्येय आहेत. हा प्रकल्प बिहार आणि पश्चिम बंगालमधील यशस्वी पाणी प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर सुरू झाला आहे.

या प्रसंगी बोलताना उपविभागीय दंडाधिकारी कर्दिले यांनी जिल्‍हा प्रशासनातर्फे ‘कोलगेट’ आणि ‘वॉटर फॉर पीपल’चे आभार मानले. ते म्हणाले, ‘या गावांसाठी सहभाग व कटिबद्धता आर्थिक सहाय्यतेपेक्षाही सर्वश्रेष्‍ठ आहे आणि यामधून प्रशासकीय, आर्थिक व तांत्रिक पातळीवरील बदल दिसून येतो.’

‘वॉटर ऑफ पीपल’च्‍या व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त मीना नरूला म्‍हणाल्‍या, ‘भांद्री गावातील आमचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. आम्‍ही ग्रामपंचायत आणि ग्रामीण पाणी व स्‍वच्‍छता समिती, अंगणवाडी आणि शालेय कर्मचारी यासह ग्रामस्थांच्या सोबतीने पाण्‍याच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करू, स्‍थापित केलेल्‍या सुविधांची देखरेख करतानाच जलपुरवठा योजना कार्यरत राहील याकडेही लक्ष देऊ. स्‍थानिक क्षमता निर्माण करण्‍यासोबतच ‘वॉटर फॉर पीपल’ ग्रामपंचायत व लाइन विभागाला योजना सुपूर्द करेल.’

या वेळी ‘वॉटर फॉर पीपल’चे मुख्य विकास अधिकारी पॅट्रिक हेज, चिखलदराचे गट विकास अधिकारी संजय काळे यांसह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link