Next
गडचिरोलीतील शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 11:19 AM
15 0 0
Share this story



गडचिरोली : उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील १२० शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी २० फेब्रुवारी २०१९ रोजी तीन बसेसद्वारे रवाना झाले.

या दौऱ्यात शेतकरी जळगाव येथील जैन इरिगेशन, अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, नाशिक येथील सह्याद्री फॉर्मर प्रोड्युसर कंपनी आणि दिंडोरी येथील फळपीक आधारीत शेती पद्धतीची, तसेच ग्रीन हाउस, शेडनेट शेती, पॅक हाउसची पाहणी करणार आहेत. या अभ्यास दौऱ्यातील पाहणीचा, अनुभवाचा गट शेतीसाठी फायदा होणार आहे.

उपविभागीय कृषी कार्यालयाच्या प्रांगणातून शेतकऱ्यांच्या बसेसना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link