Next
पाती शप्ता
BOI
Thursday, October 18 | 10:00 AM
15 0 0
Share this story


पारंपरिक पदार्थाची चव आणि नव्या पदार्थाचे रूप अशा एकत्रित गुणांचा पदार्थ असेल तर... खायला मजा येईल ना! ‘पाती शप्ता’ हा पदार्थही तसाच आहे... जरूर पाहा त्याची रेसिपी आणि करूनही पाहा...
.............
नावावरून काहीतरी वेगळा पदार्थ वाटत असला तरी अगदी सहज, झटपट बनवता येणारा आणि सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे. ही आहे पारंपरिक बंगाली मिठाई. संक्रांतीच्या सणाला बंगाली लोक आवर्जून हे पक्वान्न बनवतात. मोदकात  असणारे गूळ-खोबऱ्याचे सारण, त्यात मावा  आणि तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत डोसे यांचा मिलाफ असलेला हा पदार्थ अत्यंत रुचकर लागतो. बघायला गेले तर पारंपरिक पदार्थ, पण आधुनिक पद्धतीने सजावट केल्याने नव्या रूपात समोर येणारा हा पदार्थ करणाऱ्याला प्रशंसा आणि खाणाऱ्याला समाधान मिळवून देईल हे नक्की.

साहित्य : तांदळाचे पीठ - दीड कप, मैदा - एक कप, साखर - एक कप, वेलची पावडर - अर्धा टीस्पून, खोवलेले खोबरे - दोन कप, मावा - एक कप आणि तूप - अर्धा कप 

कृती : तांदळाचे पीठ, मैदा एकत्र करा आणि त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून  सरसरीत पीठ बनवा. त्यानंतर एक बाउल घेऊन त्यात साखर, वेलची पावडर, मावा, खोवलेले खोबरे घाला आणि चांगले मिक्स करून घ्या. 

आता डोसा बनवण्यासाठीचा तवा घ्या आणि त्यावर थोडेसे तूप घाला आणि पीठ घेऊन डोसा बनवा. डोसा खालच्या बाजूने चांगला भाजला गेल्यावर वर खोबरे आणि माव्याचे मिश्रण घाला. डोसा दुमडून खाली काढा. त्याचे समान तुकडे करा,वरून आवडीप्रमाणे मध, सुकामेवा वापरून सजावट 
करा आणि खायला द्या. 

कुरकुरीत डोसा आणि आत मऊ गूळ-खोबऱ्याचे सारण यांची चव अप्रतिम लागते.  


- शेफ केशब जाना, ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट, तळेगाव

(शेफ केशब जाना यांनी सणासुदीसाठी तयार केलेल्या सर्व खास रेसिपी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पुण्याजवळील तळेगाव येथील ‘ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link