Next
प्रियांका चोप्रा, विन डिझेल
BOI
Wednesday, July 18, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

२००० सालची मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आणि अॅक्शन हिरो विन डिझेल यांचा १८ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
प्रियांका चोप्रा

१८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूरमध्ये जन्मलेली प्रियांका चोप्रा ही २००० साली मिस वर्ल्ड किताब जिंकणारी अभिनेत्री. सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणून यशस्वी ठरल्यावर तिने काही सिनेमांची निर्मितीही केली. त्यात ‘व्हेंटिलेटर’सारख्या गाजलेल्या मराठी सिनेमाचाही समावेश आहे. तिला ‘फॅशन’ सिनेमातल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अंदाज, ऐतराज़, फॅशन, सात खून माफ आणि बाजीराव मस्तानी अशा इतर पाच सिनेमांतल्या भूमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अमेरिकन टीव्हीवरच्या लोकप्रिय ‘क्वांटिको’ सीरियलमध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती. त्या भूमिकेबद्दल तिला ‘पीपल्स चॉइस अॅवॉर्ड’ मिळाला आहे. ‘बर्फी’ आणि ‘मेरी कोम’ या सिनेमांमधला तिचा अभिनय वाखाणला गेला आहे. ३६ चायना टाउन, टॅक्सी नंबर ९२११, क्रिश, मुझसे शादी करोगी, दोस्ताना, डॉन, जय गंगाजल, दिल धडकने दो, असे तिचे काही गाजलेले सिनेमे आहेत. 
......   

विन डिझेल 

१८ जुलै १८६७ रोजी कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेला मार्क सिंक्लेअर ऊर्फ विन डिझेल हा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता. त्याने ‘फास्ट अँड फ्युरियस’ या सीरिजमध्ये रंगविलेला डॉमिनिक आणि ‘क्रॉनिकल्स ऑफ रीड्डिक’मध्ये रंगवलेला रिचर्ड रीड्डिक या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. सेव्हिंग प्रायव्हेट रायन, बॉयलर रूम, नॉकअराउंड गाइज, ट्रिपल एक्स, दी पॅसिफायर, फाइंड मी गिल्टी, बॅबिलॉन ए. डी., असे त्याचे सिनेमे गाजले आहेत.
..........

यांचाही आज जन्मदिन :

व्हॅनिटी फेअर कादंबरीचा लेखक विल्यम थॅकरी (जन्म : १८ जुलै १८११, मृत्यू : २४ डिसेंबर १८६३)
‘गॉन्झो जर्नालिझम’चा जन्मदाता हंटर थॉम्प्सन (जन्म : १८ जुलै १९३७, मृत्यू : २० फेब्रुवारी २००५)
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link