Next
तेहमी ग्रांट इन्स्टिट्युट नर्सिंग एज्युकेशनचा पदवीदान समारंभ
BOI
Saturday, December 08 | 12:11 PM
15 0 0
Share this story

तेहमी ग्रांट इन्स्टिट्युट नर्सिंग एज्युकेशनच्या पदवी प्रदान समारंभाप्रसंगी डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांच्यासह शुभांगी डुंबरे, अ‍ॅलन वामांगा,जिलियन ग्रांट,बोमी भोट, डॉ.किशोर पुजारी, सीसी क्रूझ व डॉ. संजय पठारे

पुणे : ग्रांट मेडिकल फाउंडेशनच्या तेहमी ग्रांट इन्स्टिट्युट नर्सिंग एज्युकेशनचा पदवी प्रदान समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला रूबी हॉल क्लिनिकच्या आयव्हीएफ विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता तांदुळवाडकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर आफ्रिका मेडिसिटीचे कार्यकारी संचालक अ‍ॅलन वामांगा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, रूबी हॉल क्लिनिकच्या विश्‍वस्त जिलियन ग्रांट, रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी इन्स्टिटयूटच्या प्राचार्य शुभांगी डुंबरे, लेफ्टनंट कर्नल सीसी क्रूझ, रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे या वेळी उपस्थित होते. व्यवस्थापन आणि प्रायोजकांतर्फे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली,तर १८ पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.  

या वेळी बोलताना रूबी हॉल क्लिनिकच्या आयव्हीएफ विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता तांदुळवाडकर म्हणाल्या, ‘रूग्णांच्या उपचारांमध्ये परिचारिकांद्वारे करण्यात आलेली आरोग्यसेवा अत्यंत महत्त्वाची असते. रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत परिचारिका ही सतत त्यांची देखभाल करतात आणि ते घरी जाताना त्यांच्या आनंदात तितकेच सहभागी होतात. रुबी हॉल क्लिनिक हे त्याच्या सर्वोत्तम उपचार पध्दतींसाठी नावजलेले असून, येथील कुशल परिचारिकांमुळे त्याची एक स्वतंत्र ओळख बनली आहे.’

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link