Next
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात सायकल फेरी
BOI
Wednesday, June 05, 2019 | 06:24 PM
15 0 0
Share this article:


पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवार, पाच जून रोजी पुण्यात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती. बायोस्फिअर्स, पुणे महानगरपालिका, समर्थ भारत, पुणे वनविभाग, फर्ग्युसन महाविद्यालय, पर्यावरण मंच, भा. म. संघ, भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे केंद्र अशा विविध संस्थांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पर्यावरण पंधरवड्याचे आयोजन  करण्यात आले असून, विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


शनिवारवाड्यापासून सुरू झालेली ही सायकल फेरी कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, लक्ष्मी रोड, अलका चौक, संभाजी महाराज पुतळा मार्गे फर्ग्यूसन महाविद्यालयात येऊन समाप्त झाली. या वेळी मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, अप्पर मुख्य वनसंरक्षक  डॉ. दिनेशकुमार त्यागी,  फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेतील प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मीनरसिंहन, पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता नरेंद्र साळुंके,   पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, दिलीप घोलप, निलेश फाटक, प्रसाद डोईफोडे, दत्तात्रय गायकवाड व सत्या नटराजन आदी मान्यवर उपस्थित होते. 


या वेळी अनुराग चौधरी म्हणाले, ‘राज्य प्रदूषण मुक्त होण्यासाठी सातत्याने सायकलचा वापर करणे गरजेचे आहे.' त्यागी यांनीदेखील पर्यावरण पंधरवडा उत्सवाचे कौतुक केले व वनविभागाच्या पातळीवर होत असलेल्या पर्यावरणपूरक प्रकल्पांची व उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. लक्ष्मीनरसिंहन यांनी वायू प्रदूषणाबाबतची भारताची भूमिका स्पष्ट केली.  


या फेरीत १५० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. त्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी ‘जोयआलुक्कास’ यांच्यातर्फे तुळशीची रोपे वाटण्यात आली. येणाऱ्या काळात शहरात मोठी सायकल चळवळ उभी करण्याचा संकल्पदेखील करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुरेश परदेशी यांनी केले. या उपक्रमाची प्रस्तावना व पर्यावरण पंधरवड्याबाबतची भूमिका डॉ. सचिन पुणेकर यांनी मांडली.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search