Next
‘क्लब एनर्जी’तर्फे जल संवर्धनावरील नवीन मॉड्युल
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 01:32 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : ‘क्लब एनर्जी’ या भारताच्या भावी पिढीला प्रशिक्षण देणे, तसेच त्यांना संवेदनशील बनवणे या उद्देशाने सुरू केलेल्या ‘टाटा पॉवर’च्या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमाच्या माध्यमातून ‘जल संवर्धन’ (वॉटर कन्झर्व्हेशन) या विषयावर नवे मॉड्युल सादर केल्याची घोषणा केली आहे.

‘क्लब एनर्जी’ उपक्रमातून देशाच्या भावी पिढीच्या मनात नैसर्गिक स्रोत आणि ऊर्जा संवर्धनाबद्दलचे ज्ञान आणि जाणीव निर्माण केली जाते. पाणी आणि ऊर्जा संवर्धनाच्याबाबतीत एकात्मिक आणि दमदार दृष्टिकोन अंगिकारून परिस्थितीत बदल घडवण्याच्या उद्देशाने या मॉड्युलमध्ये लहान मुलांना पाणी व ऊर्जा संवंर्धनाच्या पद्धती आणि त्यांचे महत्त्व समजून देण्यावर भर देण्यात आला आहे. हा संदेश योग्यरित्या पोहोचवण्यासाठी कंपनीने दृश्यात्मक पातळीवर अधिक आकर्षक कंटेंट तयार केला आहे. आपले घर, समुदाय आणि शहरात पाणी वाचवण्यासंदर्भातील विविध मुद्दयांवर भर देणारे माहितीपर व्हिडिओ यात आहेत. ऊर्जानिर्मितीत पाणी कसे महत्त्वाचे आहे, हे या फिल्ममध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे वीज वाचवल्यानेही पाण्याची बचत होते, हेसुद्धा यात स्पष्ट होते.

या उपक्रमाबाबत टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘टाटा पॉवरमध्ये आम्ही क्लब एनर्जीच्या माध्यमातून आम्हाला शक्य होईल तितक्या अधिक लोकांपर्यंत जलसंवर्धनाचा संदेश पोहोचवू इच्छितो. या वेळी आम्ही मुलांना, तसेच समुदायांना ते आपल्या परीने प्रयत्न करून पाणी कसे वाचवू शकतील, हे दाखवण्यासाठी दृश्य माध्यमांचा वापर केला आहे. पाणी वाचवल्याने काय फायदे होतात, हे नागरिकांना सांगण्यासोबतच या नव्या मॉड्युलमध्ये पाणी कसे वाचवावे, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search