Next
सलग १८ तास गाण्याचा पुण्यात विक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, July 02, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this article:


पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा आणि व्हीपी म्युझिक अॅकॅडमीच्या सलग २०० गाण्यांचा विक्रमाला आज (दोन जुलै) सकाळी साडेसात वाजता पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात प्रारंभ झाला. 

या उपक्रमाचे उदघाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी रोटरी क्लब पुणे शनिवार वाडाच्या अध्यक्ष अनिता पाटील, संयोजन समिती अध्यक्ष श्याम ढवळे, विवेक पांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमांना बळ देण्याचा हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे धोत्रे यांनी या वेळी सांगितले. 

राष्ट्रगीताने उपक्रमाचा प्रारंभ झाला, महाराष्ट्रगीताने समारोप झाला. यात ६० गायकांनी ऑर्केस्ट्रासोबत मराठी, हिंदी गाणी सादर केली. सकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत सलग १८ तास हा कार्यक्रम चालला. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात येणार आहे. चिंतन मोढा, अर्जुन साठे, हर्षद गनबोटे, ऋतुराज कोरे, फिरोज रमजानी, विजय चेन्नूर, रियाझ शेख, शफी शेख, घनश्याम अगरवाल, मनीष गोखले, प्रभाकर पाटील आदी कलाकार यात सहभागी झाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search