Next
‘मी पण सचिन’ची पहिली झलक
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
BOI
Friday, January 18, 2019 | 03:37 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : क्रिकेट आणि भारतीय यांच्यामधले नाते खूप दृढ आहे, हे वेगळे सांगायची गरज नाहीच. क्रिकेटपटूही आपल्याला तेवढेच जिव्हाळ्याचे असतात. असाच एक ऑनस्क्रीन क्रिकेट खेळाडू आपल्या भेटीला येत आहे, ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून. गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलेला अभिनेता स्वप्नील जोशीचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.  

‘डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’, अशी टॅगलाईन घेऊन हा ट्रेलर समोर आला आहे. गावात राहणारा एक सर्वसामान्य क्रिकेटवेडा तरुण (स्वप्नील जोशी), लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून क्रिकेटची कारकीर्द सुरू करतो. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा त्याचा प्रवास, वाटेतील अनेक समस्या, त्याचा संघर्ष या सगळ्याचा पट मांडणारा असा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहानपणीचा स्वप्नील आणि मग मध्यमवयीन स्वप्नील असे दोघेही दाखवले आहेत. म्हणजेच वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील त्याचा हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे समजते. 

श्रेयस जाधव यांनी लेखन केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. स्वप्नील जोशीबरोबर चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, अभिजित खांडकेकर, अविनाश नारकर, सुहिता थत्ते, कल्याणी मुळे अशी तगडी स्टार मंडळी दिसणार आहेत. ‘इरॉस इंटरनॅशनल’, ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तूत आणि गणराज असोसिएशनची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या एक फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

श्रेयस जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक सकारात्मकतेचा संदेश देण्याचे काम केले आहे, असे वाटते. एक सामान्य तरुण हाती काहीही नसताना केवळ आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने जीव एकवटून कष्ट करतो आणि ते मिळवतो. ही कथा नक्कीच प्रेरणादायी आहे. याशिवाय भारतीय आणि क्रिकेट यांच्यातले दृढ नातेही वेगळ्या पद्धतीने सर्वांसमोर आणण्याचे काम हा चित्रपट करेल अशी आशा वाटते.   

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search