Next
‘डीकेटीई’चे प्रा. प्रवीण उके यांना पीएचडी
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this article:

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन टेक्नॉलॉजी विभागात कार्यरत असणारे प्रा. प्रवीण उके यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजीअंतर्गत पीएचडी इन टेक्स्टाइल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त झाली आहे.

गेली १३ वर्षे ते डीकेटीईमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डीकेटीईचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘स्टडीज इन बिहेवियर ऑफ ड्रेपेबिलिटी ऑफ स्टिचड फॅब्रिक’ या विषयावर पीएचडी प्रबंध पूर्ण केला आहे. संशोधन करत असताना गारमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कापडांचे गुणधर्म, त्याची उपयोगिता या संदर्भात त्यांनी सखोल अभ्यास केला.  त्यांनी संस्थेमध्ये अत्याधुनिक ‘ड्रेप टेस्टर’ची निर्मिती केली आहे व त्यावर पेटेंटसुद्धा पब्लिश केले आहे. पीएचडी प्रकल्प पूर्ण करत असताना त्यांचे एकूण सहा प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत; तसेच स्कॉलर प्रेस, जर्मनी प्रकाशित ‘रिव्ह्यू ऑन ड्रेपेबिलिटी ऑफ सिमड फॅब्रिक्स’ या विषयावरील पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे.

प्रा. प्रवीण उकेप्रा. उके यांनी महिला क्रांती गारमेंट प्रशिक्षण केंद्राचे इनचार्ज म्हणून काम पाहिले आहे व त्याअंतर्गत महिलांना गारमेंटमधील प्रशिक्षण देण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांचे विविध टेक्निकल विषयावर एकूण २० पेपर्स राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ५० हून अधिक टेक्स्टाइल सेमिनार्स, कॉन्फरन्स व वर्कशॉपमध्ये विविध विषयावर व्याख्यान दिले आहे. कॅड कॅम, एम्ब्रॉयडरी, गारमेंट, प्रोजेक्ट प्लॅनिंग, पॅटर्न मेकिंग अशा विविध विषयावर त्यांचा हातखंडा आहे.

पीएचडी पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी डीकेटीईचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search