Next
‘होंडा’ने जागतिक व्यवसायात केला विस्तार
प्रेस रिलीज
Monday, September 24, 2018 | 05:31 PM
15 0 0
Share this story

गुरूग्राम : होंडा टू-व्हीलर्स इंडियाने भारतातील व जगभरातील ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याच्या वाटचालीतील व्यवसायाचा नवा मैलाचा टप्पा जाहीर केला आहे. निर्यातीमध्ये आक्रमकपणे वाढ करत, होंडा टू-व्हीलर्स इंडियाच्या एकत्रित निर्यातीने आता एकूण निर्यातीचा दोन दशलक्ष युनिटचा टप्पा ओलांडला आहे.

होंडा टू-व्हीलर्स इंडियाने २००१मध्ये, पहिल्याच वर्षी अॅक्टिव्हाच्या निर्यातीला सुरुवात केली. ‘होंडा’ला एकूण टू-व्हीलर निर्यातीचा एक दशलक्ष युनिटचा टप्पा पार करण्यासाठी १४ वर्षे लागली. भारतीय टू-व्हीलर उद्योगातील केवळ ‘होंडा’ बनल्यापासून होंडा टू-व्हीलर्स इंडियाने जागतिक व्यवसाय आक्रमकपणे विस्तारला आहे आणि निर्यातीतील नवा दुसऱ्या दशलक्ष युनिटचा टप्पा तिप्पट वेगाने म्हणजे केवळ तीन वर्षांत साध्य करण्यात आला.

हे लक्षणीय यश साजरे करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सेल्स व मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘२०२० या वर्षाकडे लक्ष लागलेल्या, होंडा टू-व्हीलर्स इंडियाची गुणवत्ता व संख्या या बाबतीत भारतात व जगात आघाडी घेणे ही महत्त्वाकांक्षा आहे. देशांतर्गत विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, ‘होंडा’च्या जागतिक टू-व्हीलर विक्रीमध्ये भारताचे योगदान आताच सर्वाधिक आहे. निर्यातीच्या बाबतीत, नवी मॉडेल दाखल करणे, नव्या बाजारांत प्रवेश करणे, तसेच सध्याच्या बाजारातील स्थान सक्षम करणे, अशा त्रीस्तरीय धोरणामुळे दोन दशलक्ष युनिटच्या निर्यातीचा मैलाचा टप्पा साध्य करण्यासाठी मदत झाली आहे. भारतात उत्पादित झालेल्या होंडा टू-व्हीलर्सवर विश्वास दर्शवल्याबदद्ल आम्ही जगभरातील ग्राहकांचे व बिझनेस पार्टनरचे आभारी  आहोत. २०२०मध्ये लागू होणार असलेल्या BS-VI नियमांमुळे आमच्यासाठी नवी बाजारपेठ खुली होणार आहे.’

विविध प्रदेशांमध्ये निर्यातीत विस्तार करत असलेल्या, होंडा टू-व्हीलर्स इंडियाची निर्यात आता आशिया-ओशियाना, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व व युरोप येथील २८ बाजारांना केली जात आहे.

‘होंडा’ निर्यात करत असलेल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांमध्ये आता एकूण १६ मॉडेलचा समावेश आहे. भारतात व जगात स्कूटरायझेशनला चालना देणारी ‘होंडा’ ही कंपनी पहिल्या क्रमांकाची निर्यातक असून, कंपनीचा बाजारहिस्सा ६० टक्के आहे. आता, भारतातून निर्यात केली जाणारी प्रत्येक दुसरी स्कूटर होंडा डिओ आहे. FUNtastic NAVi हे मॉडेलही आंतरराष्ट्रीय बाजारातील तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

याचबरोबर, मोटरसायकलची निर्यातही दोन आकडी वाढ साध्य करण्यात सातत्य राखणार आहे आणि ‘होंडा’च्या एकूण निर्यातीमध्ये जवळजवळ निम्मे योगदान देत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link