Next
कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा
प्रेस रिलीज
Friday, May 18 | 04:04 PM
15 0 0
Share this story

पालघर : जिह्यातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांच्या कोकण विकास मंचाने भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपला पाठिंबा देत असल्याची घोषणा सांबरे यांनी केली. भाजपच्या उमेदवाराला सर्वच थरातून पाठिंबा व्यक्त होत असल्याने पोटनिवडणुकीत गावित यांचे पारडे जड असल्याचे अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पालघर जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढले असून, जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विकास मंच आणि जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात अनेक  सामाजिक कामे केली जात आहेत. या सामाजिक कामांच्या माध्यमातून कोकण विकास मंचाचा समाजातील एका मोठ्या वर्गावर चांगला प्रभाव आहे. शिवाय या सामाजिक संस्था सर्वच समाज घटकांशी निगडीत असल्याने सांबरे यांच्या पाठिंब्याचा भाजपला नक्कीच फायदा होणार आहे.

‘पालघर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे आश्वासन दिल्याने कोकण विकास मंचाने या निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे,’ असे सांबरे यांनी सांगितले.

एकिकडे कोकण विकास मंच आणि वसईच्या जन आंदोलन समितीने भाजपला पाठिंबा जाहीर केला असतानाच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीलाही धक्का बसला आहे. बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील आणि सुनील धानवा यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. धानवा यांनी २००९ची बोईसर विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link