Next
डॉ आंबेडकर महाविद्यालयात परिसंवाद उत्साहात
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 05:53 PM
15 0 0
Share this storyऔंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी विभाग, इतिहास विभाग आणि लोकायत संस्था यांच्या वतीने ‘जातिप्रथेचे उच्चाटन’  या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव प्रा. सुभाष वारे, लोकायत विद्यार्थी संघटनेचे तुषार आणि सायली, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, सविता पाटील, डॉ. तानाजी हातेकर, सायली गोसावी, प्रा. कुशल पाखले, डॉ. अतुल चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी प्रा. वारे म्हणाले, ‘जातीप्रथा म्हणजे जीना नसलेली इमारत आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे दीर्घकाळ जाती व्यवस्था अस्तित्वात राहिली आहे. धर्माच्या नियमानुसार सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घेणे पाप समजले जात होते. श्रमाला प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे खालच्या जातीमधील माणसाला पुढे जाण्याची संधी नाकारली गेली. त्यामुळे माणसांमधील कौशल्ये आणि उर्मी नष्ट झाली. जात  माणसाला ओळख आणि सुरक्षा देते. लग्नसंस्कार आणि अंत्यसंस्कार पार पाडताना एका जातीमधील लोक एकत्र येतात.’

‘सर्वसामान्य माणसाला जात ओळख प्राप्त करून देते. त्यामुळे लोक जातीला अधिक चिकटून आहेत. खरे तर प्रत्येक माणसाने भारतीय म्हणून एकत्र यायला हवे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक वातावरण निर्माण करायला हवे. आपण सर्वांनी समतेचा पुरस्कार करायला हवा. समाज एका पायरीवर उभा नाही. सर्वांना समान संधी मिळावी म्हणून आरक्षण आहे. खरे तर आरक्षण ही आजारी व्यवस्थेचे लक्षण आहे,’ असे त्यांनी नमूद केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘भारतीय राज्यघटने सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही तत्त्वे बहाल केली आहेत. या तत्त्वांचा पुरस्कार करून,  आपण माणूस म्हणून जीवन जगायला पाहिजे. जातीयता नष्ट होण्यासाठी आपण स्वत:पासून सुरुवात करायला पाहिजे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. आणि माणूस म्हणून जीवन जगणार, असा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी करावा.’या परिसंवादामध्ये महाविद्यालयातील चंद्रकांत सोनवणे, जय काकडे, अजिंक्य कांबळे, अनिरुद्ध, मोनाली परिहार,  रवींद्र जाधव, गौरव जाधव, सूर्यकांत आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. संजय नगरकर यांनी करून दिली. प्रा. सुप्रिया पवार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link