Next
‘टाटा मोटर्स’तर्फे ‘फोटो ओके प्लीज’ स्पर्धा
प्रेस रिलीज
Thursday, January 31, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘टाटा मोटर्स’ कंपनीतर्फे ट्रक व्यवसायातील कलाकारांसाठी ‘फोटो ओके प्लीज’ ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या व्यवसायातील लोकांच्या आयुष्यातील आनंद शोधणे आणि चालकांना डिजिटल यंत्रणा वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे या हेतूने राबवण्यात येणारी ही  स्पर्धा आता देशभर पोहोचली आहे. संपूर्ण देशातील २१ शहरांतून आतापर्यंत साडेपाच हजार चालकांनी स्पर्धेसाठी नावनोंदणी केली असून, १३ हजारांहून जास्त फोटो प्रवेशिका आल्या आहेत.

या स्पर्धेत चालकांची निवड आणि गौरव करण्यात येणार आहे. ‘टाटा’चे ट्रक व्यावसायिक आणि चालक आपल्या कामाच्या निमित्ताने भारतभरात अनेक न पाहिलेल्या ठिकाणी जात असतात. हे चालक त्यांच्या प्रवासाच्या अनुभवाचे फोटो या स्पर्धेसाठी पाठवीत असून, या स्पर्धेमुळे ते कुठपर्यंत पोचतात, ती ठिकाणे कशी असतात, त्यांचे काम कसे असते अशा सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत.

देशभरातून दर दिवशी मोठ्या प्रमाणावर फोटो, प्रवेशिका येत आहेत. या स्पर्धेत दैनंदिन विजेता आणि आठवड्याचा विजेता अशी नावे जाहीर केली जात आहे. ही स्पर्धा अद्यापही सुरूच आहे. स्पर्धेसाठी सोशल मीडियावर फोटो विजेत्यांची नाव जाहीर करताना, त्यांचा एकट्याचा फोटो, त्यांचे नाव, त्यांच्या ट्रकच्या मॉडेलचे नाव आणि नंबर, ठिकाणाचे तपशील देण्यात येत आहेत. सर्वोत्तम तीन प्रवेशिकांची निवड केली जाणार असून, पहिल्या आणि दुसऱ्या पारितोषिक विजेत्याला अनुक्रम्रे ७५ हजार व ४० हजार रुपये किंमतीचे कुटुंबाबरोबर हॉलिडे पॅकेज मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचा स्मार्टफोन दिला जाणार आहे. याबरोबर दर आठवड्याला बक्षिसे दिली जातील.

या विषयी बोलताना टाटा मोटर्सचे हेड मार्केटिंग कम्युनिकेशन्स (सीव्हीबीयू) यूटी रामप्रसाद म्हणाले, ‘आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या ट्रक चालकांसाठी टाटा मोटर्स नेहमीच सकारात्मकतेने प्रयत्न करत असते. चालकांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता यावे आणि त्यांचा सोशल मीडियावरील शेअर करण्याचा अनुभव अधिक समृद्ध व्हावा यासाठी ‘फोटो ओके प्लीज’ हे व्यासपीठ देण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे आपल्याला ट्रक चालकांच्या आयुष्याविषयी अधिक जाणून घेता येणार आहे, याबरोबरच अनेक तरुणांनाही हा करिअरचा चांगला पर्याय असू शकतो हे समजू शकणार आहे. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला आहे आणि अद्याप प्रवेशिका येतच आहेत.’

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप यांसारख्या सामाजिक माध्यमांतून ट्रकचालकांपर्यंत पोहोचता येत आहे. या स्पर्धेमुळे ट्रकचालकांचे आयुष्य सोशल मीडिया चॅनेल्समधून आणि खास तयार केलेल्या वेबसाइटच्या माध्यमातून स्पर्धेसाठी मांडले जात आहे. याबरोबरच टीव्हीवरील उपक्रम आणि डिजिटल चॅनेल्सवरही प्रवेशिका येत आहेत. या स्पर्धेसाठी विविधांगी वेबसाइट तयार करण्यात आली आहे. ही वेबसाइट नोंदणी, टिप्स, विजेत्यांची नावे जाहीर करणे यासाठी वापरली जात आहे. याबरोबरच वितरकांकडेही सक्रिय उपक्रम राबवले जात आहेत.

वर्षभर चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची सांगता ३० मार्च २०१९ रोजी होईल. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्याचे नाव एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link