Next
एमकॅफिन नीम कॅफिन फेसवॉश
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 02:23 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘एमकॅफिन’ या कॉफीचा समावेश असलेल्या भारतातील पहिल्या पर्सनल केअर ब्रँडने अॅमेझॉनच्या लाँचपॅड प्रोग्रामदरम्यान ‘एमकॅफिन नीम कॅफिन फेसवॉश’चे अनावरण केले होते. अॅमेझॉनचा लाँचपॅड प्रोग्राम हे स्टार्ट-अप्सना आपली अद्वितीय उत्पादने जगभरातील लाखो ग्राहकांसमोर मांडण्याची संधी देणारे एक व्यासपीठ आहे. हा फेशवॉश आता अॅमेझॉनवर विक्री होणाऱ्या दहा हजारांहून अधिक स्किन केअर उत्पादनांमधील अव्वल ५० उत्पादनांच्या यादीत सामील झाला आहे.

या फेसवॉशमध्ये अर्गन तेल व व्हिटॅमिन ईची पौष्टिक तत्त्वे आणि कडुनिंब व कॉफी समाविष्ट आहे. हा फेसवॉश चेहऱ्यावरील अशुद्धींना साफ करत त्वचा टवटवीत करतो. या उत्पादनामधील कॉफी त्वचेला कोमलता देते, तर अँटिबॅक्टरल एजंट कडुनिंब मुरमं, हायपर-पिग्मेंटेशन, चेहऱ्यावरील छिद्रे, पुरळ कमी करण्यामध्ये मदत करते. अर्गन तेल व व्हिटॅमिन ईचे मिश्रण त्वचेला संरक्षण देण्यासोबतच पोषण देखील देते. बारकाईने निवडण्यात आलेल्या आणि उत्तम गुण असलेल्या घटकांसह तयार करण्यात आलेले एमकॅफिन नीम कॅफिन फेसवॉश हे पॅराबेन-मुक्त उत्पादन आहे. सर्व एमकॅफिन उत्पादने ‘क्रूएल्टी फ्री क्लेम’सह येतात आणि त्यांची कोणत्याच प्राण्यावर चाचणी करण्यात आलेली नाही.

सर्व एमकॅफिन उत्पादनांमध्ये कॉफी हा मुख्य घटक समाविष्ट आहे. कॅफिनमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी व अँटी-एजिंगची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. त्वचा व केसांवरील कॅफिनच्या वैद्यकिय परिणामांसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यात आले आहे. एमकॅफिन या कॅफिन-संदर्भात वैयक्तिक केअरची सुविधा देणाऱ्या भारताच्या पहिल्या ब्रँडने ‘एव्हेन्डस कॅपिटल’चे व्यवस्थापकीय संचालक कौशल अग्रवाल, ‘वझीर अॅडवायजर्स’चे व्यवस्थापकीय संचालक हरमिंदर साहनी, ‘कॅपिलरी टेक्नोलॉजिज’चे माजी-मुख्य तंत्रज्ञान अधिकारी के. के. मेहरा आणि ‘ओला कॅब्ज’मधील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणय जिव्रज्का यांसारख्या दिग्गज गुंतवणूकदारांकडून तीन लाख डॉलर्सचा निधी उभारला आहे. कंपनी त्यांच्या विपणन, आरअँडडी व विश्लेषणात्मक विभागाच्या विकासासाठी आणि पुरवठा साखळी वाढवण्यासाठी या निधीचा उपयोग करण्याची योजना आखत आहे.

विकास लछवानी आणि तरुण शर्मा यांनी २०१५मध्ये एमकॅफिनची स्थापना केली. एमकॅफिन शॅम्पू, फेसवॉश, शॉवर जेल इत्यादींसारख्या वैयक्तिक केअर उत्पादनांचा व्यवहार करते. एमकॅफिनची वैयक्तिक केअर उत्पादनांची रेंज प्रिमिअम विभागामध्ये समाविष्ट आहे, ज्यामधून हेअर व स्किन केअर उत्पादनांमधील वैयक्तिक केअरला चालना मिळत आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link