Next
‘नेटसर्फ’ची दोन नवी नैसर्गिक उत्पादने
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 06:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतातील अग्रगण्य डायरेक्ट सेलिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या नेटसर्फ नेटवर्कने आपल्या ‘क्लीन अँड मोअर’ या होम केअर ब्रँडच्या अंतर्गत दोन नवीन उत्पादनांची घोषणा केली आहे. ही दोन उत्पादने संपूर्ण घराची सफाई करण्यासाठी सक्षम असून, त्यामुळे ती घराच्या सफाईसाठी लागणार्‍या इतर सर्व प्रॉडक्टस्ची जागा घेतील.

ही उत्पादने वनस्पतींच्या अर्कापासून बनवली असल्याने ती संपूर्णतः बिनविषारी व पर्यावरणास अनुकूलही आहेत. ही उत्पादने ‘कॉन्संट्रेटेड’ असून, सफाईनंतर कोणतेही हानिकारक रसायनांचे अवशेष पृष्ठभागावर सोडत नाहीत आणि लहान मुले, पाळीव प्राणी व निसर्गासाठी अनुकूल आहेत. या उत्पादनांचे कुठल्याही प्राण्यांवर प्रयोग केलेले नसून या उत्पादनांमुळे सांडपाणी व समुद्रीजीवनावर कोणतेही विपरित परिणाम होत नाहीत.

या सर्व घातक परिणामांचा अभ्यास करून ‘नेटसर्फ’च्या संशोधकांनी नैसर्गिक स्वच्छतेच्या एका नव्या संकल्पनेची निर्मिती केली. ‘नेटसर्फ’ मल्टीपर्पज होम क्लिनर आणि फॅब्रिक वॉश व कंडिशनर अशी दोन नवीन बिन विषारी व पर्यावरणास अनुकूल अशी होम केअर प्रॉडक्टस् तयार केली आहेत.

ही दोन्ही उत्पादने थाइम, पांढरे व्हिनेगर, क्लॅरी सेज व जिरॅनिअमसारख्या वनस्पतींपासून बनविलेली आहेत. या उत्पादनांमध्ये नैसर्गिक सखोल स्वच्छता व पृष्ठभागांवरील घातक जीवाणू कमी करण्यासाठी प्रोबायोटिक्स् आणि नैसर्गिक सफाईची प्रक्रिया जलद करण्यासाठी एन्झाइम्स् ही उपस्थित आहेत. त्यामुळे या प्रॉडक्टस्मध्ये कोणतेही घातक विषारी रसायन नसून ती उत्कृष्टरित्या नैसर्गिक स्वच्छता करतात.

मल्टीपर्पज होम क्लिनर हे एक कार्यक्षम बायोसाईड असून, ते घरातील बहुतांश पृष्ठभाग, वाहने नैसर्गिकरित्या स्वच्छ करून त्यांना चमकदार बनवते. हे वापरास इतके सुरक्षित आहे की आपण याने भाजीपाला व फळे ही धूऊ शकता. या एका मल्टीपर्पज क्लिनरमुळे महिन्याच्या वाणसामानातील अनेक साफसफाईच्या उत्पादनांवर होणारा खर्च वाचतो. हे उत्पादन आपण फरशी, काच, लाकूड, चामडे, वाहने, स्वयंपाकाची भांडी, विजेवर चालणारी घरगुती यंत्रे, स्वयंपाकाचा ओटा, टेबल, बाथरूममधील नळ-शॉवर, व्यायामाची उपकरणे, खेळणी अगदी कमोड अशा कुठल्याही पृष्ठभागाच्या सफाईसाठी वापरता येऊ शकते.

फॅब्रिक वॉश व कंडिशनर हे कपडे धुण्याचे नैसर्गिक उत्पादन आहे. हे एकच प्रॉडक्ट वॉशिंग मशिन व हाताने कपडे धुण्यास अनुकूल असून, ते आपल्या घरातील डिटर्जेंट पावडर, डिटर्जेंट बार आणि फॅब्रिक कंडिशनरची जागा घेते. हे कपड्यातील धाग्यांची झिज कमी करते. त्यामुळे कपडे जास्त काळ नव्यासारखे दिसतात. त्याचप्रमाणे कपड्यांची चमक व मऊपणा टिकून राहतो म्हणून हा एक कपड्यांसाठीचा ‘नैसर्गिक अँटी एजिंग फॉर्म्युला’ आहे. यामुळे कपडे मऊ व त्वचेस सुखावह वाटतात. हे प्रॉडक्ट सर्व प्रकारचे कपडे जसे की कॉटन, सिल्क, पॉलिएस्टर, नायलॉन, लिनन, लोकर आदींसाठी अनुकूल आहे.

‘नेटसर्फ’ने आपल्या अद्वितीय ‘मेक इन इंडिया प्रोडक्ट्स’नी भारतीय डायरेक्टसेलिंग इंडस्ट्रीमध्ये नवीन मानके सिद्ध केली आहेत. त्याचप्रमाणे आम्ही ‘स्वच्छ भारत अभियाना’चेही पुरस्कर्ते आहोत. कारण आम्ही अशी उत्पादने सादर करतो जी माणसांसाठी व निसर्गासाठी अनुकूल असून, परिणामकारकरित्या घराची स्वच्छता करतात,’ असे ‘नेटसर्फ’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष सुजित जैन म्हणाले.

‘यापुढे भारतीय ग्राहकांना त्यांचे घर स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या आरोग्याचा धोका पत्करावा लागणार नाही,’ असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link