Next
पंढरपूर येथे मातृदिनानिमित्त भित्तीकाव्य चित्रप्रदर्शन
BOI
Tuesday, May 15 | 11:29 AM
15 0 0
Share this storyसोलापूर : जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथे साहित्य वर्तुळ परिवारातर्फे भित्तीकाव्यचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमाला मातृभक्त भागवताचार्य वा. ना. उत्पात यांची विशेष उपस्थिती लाभली.

रवी वसंत सोनार यांच्या संकल्पनेतून मातृदिनानिमित्त त्यांच्या आई पुष्पावती वसंत सोनार यांच्या स्मरणार्थ पुष्पाई भित्तीकाव्यचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून सुमारे दोनशेहून अधिक कवींनी आईबद्दलचे काव्य लिहून पाठविले होते. यातील निवडक सुमारे पन्नास कवींच्या कवितांचे पोस्टर बनवून त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात निवड झालेल्या कवी व कवयित्रींचा साहित्य परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.

या वेळी भागवताचार्य उत्पात यांनी आपल्या आईची आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘अठराविश्वे दारिद्र्यात राहूनही आम्हाला कोणापुढेही हात न पसरवण्याची शिकवण आमच्या आईनेच दिली. आपली संस्कृती ही मातृसंस्कृती आहे. आई हे आपले दैवत आहे त्यामुळे आईचा अपमान करू नका, तिचा शब्द मोडू नका. आई हा एक भावनेचा विषय आहे. अनेक कवींनी आईबद्दल भरभरून लिहिले आहे. सर्व थोर पुरुष मातृभक्त आहेत. व्यासांनी, तर मातृस्तोत्र लिहिले आहे. आपला पहिला गुरू आई आहे. हिटलर क्रूर होताच, पण त्याचे आपल्या आईवर निस्सीम प्रेम होते. संन्याशाला देवाचे दर्शन घेता येत नाही; मात्र आईचे दर्शन घेण्याची त्यांना मुभा असते. यातूनच आईचे महत्त्व पटते. रवी सोनारांनी मातृदिनानिमित्त आयोजित केलेले भित्तीकाव्यचित्र प्रदर्शनअनोखे आहे.’

साहित्य वर्तुळ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सोनार यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या वेळी सुवर्णा आप्पासाहेब चव्हाण, द्वारकाबाई वसंतराव लादे, प्रभावती प्रभाकर वांगीकर, पुष्पावती शिवदास भिंगे आणि उषा अरुणशेठ मंजरतकर या आदर्श मातांचा सत्कार उत्पात यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या प्रतिनिधीशी बोलताना आयोजक सोनार म्हणाले, ‘या प्रदर्शनात असलेल्या प्रत्येक कवितेच्या कवी व कवयित्रींच्या आईविषयीच्या भावभावना आगळ्यावेगळ्या आणि कदाचित समसमान असतील, त्या सगळ्या भावभावना समजून घेऊन आज साहित्य वर्तुळ परिवारातर्फे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.’

‘भित्तीकाव्यचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या आईविषयीच्या भावना आम्हाला व्यक्त करता आल्या. हा एक स्तुत्य उपक्रम कवी रवी सोनार यांनी राबवल्याचा आनंद होत आहे,’ अशी प्रतिक्रिया माजी प्राचार्य शिवाजीराव बागल यांनी व्यक्त केली.

‘अनेक लोकांनी आईविषयी लिखाण केले आहे. त्यांचे लिखाण भित्तीकाव्य प्रदर्शनात वाचायला मिळाले; परंतु आमच्याही कविता इथे पोस्टरच्या माध्यमातून झळकल्या त्याचा अतिशय आनंद होत आहे,’ असे सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

(सोबत पुष्पाई भित्तीकाव्यचित्र प्रदर्शनाचा व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
डॉ . प्रविण तोडकर , सोलापूर About 251 Days ago
खूप छान बातमी आहे . अनेक कविंना प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे .
0
0

Select Language
Share Link