Next
धायगुडे यांना ‘सौदामिनी’ पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Tuesday, March 06, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : पुण्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या हिंदू महिला सभेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘सौदामिनी’ पुरस्कार यावर्षी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले यांनी दिली आहे.

संगीता धायगुडेजागतिक महिला दिनानिमित्त १० मार्च, २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता एरंडवणे येथील मनोहर मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम होणार असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिका आणि गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांच्या हस्ते संगीता धायगुडे यांना ‘सौदामिनी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून मानपत्र, दहा हजार रुपये, पैठणी असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

त्यानंतर प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ हे संगीता धायगुडे यांची प्रकट मुलाखत घेतील. ज्यातून धायगुडे यांचा खडतर आणि यशस्वी असा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, १० मार्च २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
surendra Deokate About
Congratulations vahini
0
0
Ujjwala Deore About
हार्दिक अभिनंदन !!!
0
0
Ajay Gorad About
Congratulations madam
0
0
Rohit kannor About
Congratulations respected mam
0
0
Vilas Pandurang patil About
On international woman’s day Day Sangita Dhygude getting the honour of soudamini Which is proper by hindu Mahila sabha I congratulate her and also Hindu mahila sabha for choosing her for this great honour for struggling women serving for society from her better administrations Na khaungi and na Khane dungi No curruption in her tenure at Virar , malegaon and Dhule municipal corporations She is brave lady officer struggling lot for keeping clean and green city
0
0
Suvarna Popatrao Kumavat About
Congratulations Madam.
0
0
पूर्णिमा खांबेटे About
आपला उपक्रम स्तुत्यच आहे.आमच्या खूप खूप शुभेच्छा.
1
0

Select Language
Share Link