Next
महेश नामपूरकर यांना मानाचे ‘ए डिझाईन अॅवॉर्ड’
BOI
Tuesday, July 02, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

महेश नामपूरकरपुणे : पुण्यातील प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर व वास्तुविशारद महेश नामपूरकर यांना डिझाइन क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा ‘ए डिझाइन अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. इटलीमधील कोमो येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात महेश नामपूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

पुण्यातील ‘सनीज वर्ल्ड’ आणि वापी येथील ‘अवध हेलिकोनिया’ या प्रकल्पांसाठी त्यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. ‘ए डिझाइन अॅवॉर्ड अँड काँपिटिशन’ स्पर्धेत विविध क्षेत्रांमधील उपयुक्त व नावीन्यपूर्ण डिझाइन्सचा गौरव केला जातो. या स्पर्धेत २२ देशांमधील परीक्षकांनी ३५०० स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड केली. 
  
पुण्यातील सूसमध्ये असलेल्या ‘सनीज वर्ल्ड’ येथे नामपूरकर यांनी कल्पक लँडस्केपिंगद्वारे पडीक दगडखाणीचे रुपांतर उत्तम अशा ‘ट्रॉपिकल लीजर डेस्टिनेशन’मध्ये केले आहे, तर वापीमधील ‘अवध हेलिकोनिया’ हा एक गृहप्रकल्प आहे. 

नामपूरकर म्हणाले, ‘माझे वडील शेतीतज्ञ गजानन नामपूरकर यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व माझ्या मनावर कायम ठसवले. त्यामुळे वास्तुरचना आणि लँडस्केपिंग करतानाही पर्यावरणाचा विचार सर्वप्रथम करण्याची सवय मला लागली. ‘सनीज वर्ल्ड’ प्रकल्पाच्या रचनेत नवीन झाडे लावण्याबरोबरच तिथले नैसर्गिक झरे वाहते कसे करता येतील याची काळजी घेण्यात आली. प्रकल्पाचे मालक व व्यवस्थापकीय संचालक विनायक निम्हण यांची या प्रकल्पासाठी मोठीच साथ मिळाली.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search