Next
‘गंगाधर स्वरोत्सव’ रंगणार १८ जानेवारीपासून
प्रेस रिलीज
Thursday, January 17, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this story

कौशिकी चक्रवर्तीश्रीनिवास जोशीपंडित विजय घाटेपुणे : स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित चौथा तीन दिवसीय ‘गंगाधर स्वरोत्सव’ १८ ते २० जानेवारी २०१९ या दरम्यान सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्राच्या सभागृहात रोज सायंकाळी ६.३० वाजता रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती, गायक श्रीनिवास जोशी, गायक अमोल निसळ, तबलावादक पंडित विजय घाटे, गायिका सानिया पाटणकर, बासरीवादक दीपक भानुसे, सितारवादक रईस खान यांचे सादरीकरण होणार आहे.  

सानिया पाटणकरअमोल निसळरईस खानहा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी ‘स्वरनिनाद’ कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जाते. या स्वरोत्सवाचे उद्घाटन १८ जानेवारीला सानिया पाटणकर यांच्या गायनाने, तर रईस खान व दीपक भानुसे यांच्या वादनाने होणार आहे. १९ जानेवारीला अमोल निसळ यांचे गायन आणि पं. विजय घाटे, श्रीधर पार्थसारथी आणि शीतल कोलवालकर यांची तालवाद्य कचेरी सादर होणार आहे.

स्वरोत्सवाचा समारोप प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती व पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य श्रीनिवास जोशी यांच्या बहारदार गायनाने होणार आहे. नीलेश रणदिवे (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), पं. अरविंदकुमार आझाद हे मैफलीला साथसंगत करतील.

कार्यक्रमाविषयी :
कालावधी : १
८ ते २० जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : मुक्तांगण बालरंजन केंद्राचे सभागृह, सहकारनगर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link