Next
फोक्‍सवॅगन अॅकॅडमीचा ‘एसएसओयू’शी सहयोग
प्रेस रिलीज
Friday, April 06 | 04:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : फोक्‍सवॅगन अॅकॅडमीने येथील सिम्बॉयसिस स्किल्‍स अँड ओपन युनिव्‍हर्सिटी सोबत सहयोग जोडला आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून फ्रंट लेव्‍हल सुपरवायजर्स म्‍हणून बढती देण्‍यात आलेल्‍या कर्मचाऱ्यांसाठी युनिक मॉड्युल तयार करण्‍यात येईल. या कर्मचाऱ्यांना भावी टीम लीडर्स बनवणे हा यामागील मूळ हेतू आहे.

चाकणमधील फोक्‍सवॅगन पुणे प्‍लांट येथील हे सुपरवायजर्स या प्रोग्रामसाठी पात्र असतील. व्‍यवसाय संचार कौशल्‍ये, संस्‍थात्‍मक व उत्‍पादन प्रणालींची सर्वोत्‍तम सखोल समज विकसित करत सहभागींचे अधिकृत डिप्‍लोमा शिक्षण व वास्‍तविक क्षमता यामधील पोकळी दूर करण्‍यावर या मॉड्युलचा फोकस असेल. सिम्बॉयसिस स्किल्‍स अँड ओपन युनिव्‍हर्सिटी ही महाराष्‍ट्राची पहिली कौशल्‍य विकास युनिव्‍हर्सिटी आहे. ही युनिव्‍हर्सिटी मल्‍टी-एंट्री एक्झिट, आधीच्‍या शिक्षणाची ओळख, क्रेडिट ट्रान्‍सफर आदींसारख्‍या प्रोग्राम्‍समधील अद्वितीय वैशिष्‍ट्ये देते आणि रि-स्किलिंग अधिक आकर्षक करते.

मॉड्युलमध्‍ये बेसिक टेक्‍नोलॉजिकल कॉम्‍पिटन्‍स, बेसिक मॅनेजेरिअल कॉम्‍पिटन्‍स आणि बेसिक बीहेवीरल कॉम्‍पिटन्‍स यांचा समावेश असेल. सुरुवातीच्‍या प्रोग्रामसाठी फोक्‍सवॅगन अॅकॅडमी १६ कर्मचाऱ्यांची नोंदणी करत आहे आणि टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अधिक कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्‍यात येईल. हा वीकेंड प्रोग्राम असून, १५ एप्रिल २०१८ पासून सुरू होईल.

सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या करताना डॉ. अँड्रीस लॉरमन आणि डॉ. स्‍वाती मुजुमदारफोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. अँड्रीस लॉरमन आणि ‘एसएसओयू’च्या प्रकुलगुरू डॉ. स्‍वाती मुजुमदार यांनी चार एप्रिल २०१८ रोजी ‘एसएसओयू’ येथे सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या.

डॉ. अँड्रीस म्‍हणाले, ‘फोक्‍सवॅगनमधील प्रतिभांचा सन्‍मान करण्‍याची आणि त्‍यांच्‍या करिअर्समध्‍ये वैयक्तिक व व्‍यावसायिक प्रगती करण्‍यासाठी त्‍यांना संधी देण्‍याची आमची पद्धत आहे. हा प्रोग्राम या कर्मचाऱ्यांना पुढील स्‍तरावर घेऊन जाण्‍यासाठी त्‍यांच्‍यामध्‍ये व्‍यवस्‍थापकीय क्षमता विकसित करण्‍यासाठी वैयक्तिक व व्‍यावसायिकमधील पोकळींना दूर करेल. ‘एसएसओयू’ने आमच्‍यासोबत हे युनिक मॉड्युल तयार केले आहे. हे मॉड्युल ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रामध्‍ये मोठ्या प्रमाणात कौशल्‍य निर्माणासाठी लाभदायी ठरेल.’ हा प्रोग्राम आपल्‍या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘कुशल भारत’ उपक्रमाशी संलग्‍न असल्याचे ते म्हणाले.

‘एसएसओयू’च्‍या प्रकुलगुरू डॉ. मुजुमदार म्‍हणाल्‍या, ‘फोक्‍सवॅगन अॅकॅडमी व ‘एसएसओयू’ यांनी सहयोगाने तयार केलेला हा अत्‍यंत युनिक प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम वैयक्तिक व व्‍यावसायिक प्रगती करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यासाठी योग्‍य व्‍यासपीठ आहे. हा प्रोग्राम विविध स्‍तरांवर कौशल्‍य ज्ञान वितरित करण्‍याच्‍या युनिव्‍हर्सिटीच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न असून, ‘कुशल भारत’ मिशनवर फोकस करतो. आम्‍ही या थोर उपक्रमासाठी अग्रणी भूमिका घेतलेल्‍या फोक्‍सवॅगन इंडिया व फोक्‍सवॅगन अॅकॅडमीचे आभार मानतो.’

फोक्‍सवॅगन अॅकॅडमीबाबत :

फोक्‍सवॅगन इंडियाने २०१३मध्‍ये फोक्‍सवॅगन अॅकॅडमीची स्‍थापना केली. ही अॅकॅडमी फोक्‍सवॅगन ग्रुप व ग्रुपच्‍या माध्‍यम भागीदारांना तांत्रिक व अतांत्रिक प्रशिक्षण सोल्‍यूशन्‍स देते. याव्‍यतिरिक्‍त पात्र कर्मचाऱ्यांसाठी फोक्‍सवॅगन ग्रुपच्‍या विविध ब्रँड्सच्‍या प्रशिक्षण मागणीची पूर्तता करणे आणि सुसज्‍ज उद्योग व्‍यावसायिकांची निर्मिती करणे हा अॅकॅडमीचा हेतू आहे. ही अॅकॅडमी अद्वितीय टेक्निकल अॅप्रेन्टिस प्रोग्राम (व्‍हीजी-टीएपी) देखील चालवते. या प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रासाठी आणि डिलरशिप पातळीवरील पूरक रिक्रूटमेंटसाठी पात्र प्रतिभांची निर्मिती केली जाते.

फोक्सवॅगन ग्रुप इंडियाबाबत :
फोक्सवॅगन ग्रुप भारतात मुख्यत: ऑडी, लँबॉर्गिनी, पोर्शे, स्कोडा आणि फोक्सवॅगन या पाच प्रवासी कार ब्रँड्समुळे ओळखला जातो. स्कोडा या ब्रँडच्या माध्यमातून २००१ मध्ये भारतात आलेला फोक्सवॅगन ग्रुप गेल्या १५ वर्षांपासून भारतात आहे. यातील प्रत्येक ब्रँडची आपली अशी एक खासियत आहे आणि प्रत्येक ब्रँड बाजारपेठेत एक स्वतंत्र ओळख टिकवून आहे. फोक्सवॅगन ग्रुपचे भारतात सुमारे ३० मॉडेल्स, सुमारे २४० डिलरशीप्स आणि पुणे आणि औरंगाबाद असे दोन प्लांट्स आहेत. पुण्यातील कारखान्यात दरवर्षी दोन लाख गाड्यांची निर्मिती करण्याची क्षमता आहे (अधिकतम तीन शिफ्टि सिस्‍टममध्‍ये) आणि इथे सध्या फोक्सवॅगन पोलो, अमिओ, वेंटो आणि स्कोडा रॅपिड या गाड्यांची निर्मिती केली जाते. भारतात विकल्या जाणार्‍या ऑडी, स्कोडा आणि फोक्सवॅगनच्या विविध प्रिमिअम आणि लक्झुरी गाड्यांचे असेंब्लिंग औरंगाबाद प्लांटमध्ये होते. या कारखान्याची क्षमता वर्षाला साधारण ८९ हजार गाड्या इतकी आहे.

‘एसएसओयू’बाबत :
‘एसएसओयू’ ही भारताची अग्रणी व महाराष्‍ट्राची पहिली कौशल्‍य विकास युनिव्‍हर्सिटी आहे. अध्‍ययनाचे मॉडेल स्‍थळ निर्माण करण्‍याचे या युनिव्‍हर्सिटीचे व्हिजन आहे, जेथे विद्यार्थी व श्रमजीवी व्‍यावसायिक उद्योगाशी संबंधित व समाजासाठी उपयुक्‍त असे ज्ञान व कौशल्‍ये प्राप्‍त करू शकतात. युनिव्‍हर्सिटीचे कँपस पुणे-मुंबई एक्‍स्‍प्रेसवेजवळील किवले गावामध्‍ये आहे. युनिव्‍हर्सिटीमध्‍ये जागतिक दर्जाच्‍या पायाभूत सुविधा, विशेष कौशल्‍य प्रशिक्षण देणा-या प्रयोगशाळा आणि उद्योगासोबतच्‍या सहयोगाने स्‍थापित करणारे आलेले सेंटर्स ऑफ एक्‍सलन्‍स आहे. युनिव्‍हर्सिटी विभागाशी संबंधित इंजीनिअरिंग, व्‍यवस्‍थापन, विज्ञान व आर्किटेक्‍चर अभ्‍यासक्रमाशिवाय लघुकालीन कोर्सेसची सुविधा देते.

अधिक माहितीसाठी : www.ssou.ac.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link