Next
सोलापुरातील गुळवंची गावाचा वॉटर कप स्पर्धेत सहभाग
BOI
Monday, March 18, 2019 | 03:08 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर : पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ या स्पर्धेत उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गाव सहभागी झाले आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी १६ मार्चला गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात पाणी फाउंडेशनच्या कामाबद्दल जनजागृती करण्यात आली.

यानिमित्त एक दिवसीय कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यशाळेत गावातील लहान आबालवृद्ध उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यशाळेदरम्यान गुळवंची गावाला पाणीदार करण्याचा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. या वेळी गावातील जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापकांसह श्री सद्गुरू अण्णा माऊली विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कलाकार ओंकार बोराडे यांनी उत्कृष्ट हलगीवादन करून सर्वांना प्रोत्साहित केले. या वेळी पाणी फाउंडेशनची टीम उपस्थित होती. याकामी पाणीदार व्यक्तिमत्व अप्पासाहेब कोरके, सुहासराजे भोसले, धनाजी भोसले, राज कदम, शहाजी माने आदींचे विशेष सहकार्य लाभले. पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विश्वास गायकवाड व प्रशिक्षक श्री. अक्षय यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. या चळवळीला प्रोत्साहन म्हणून कार्यक्रमातील सर्व उपस्थितांना चहा व नाष्टा देण्यासाठी आदर्श शिक्षक राजेंद्र माने व जलमित्र आबीद शहाबाद यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

या प्रभात फेरीमुळे गावातील वातावरण पाणी फाउंडेशनमय झाले असून, गावकरी शहाजी बोराडे व सोमनाथ पवार यांनी आम्ही आमचे गाव पाणीदार बनविण्यासाठी योगदान देणार असल्याचे सांगितले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search