Next
जवानांना पत्र पाठवून पाठिंबा
पुण्यातील नागरिकांचा अनोखा उपक्रम
BOI
Tuesday, February 26, 2019 | 12:32 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सीमेवर प्राण हाती घेऊन देशाची सुरक्षा करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील काही नागरिकांनी सैनिकांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जवानांना दर वर्षी राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी ही संकल्पना मांडली. त्यात जोशी समाजसेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. 

‘सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी त्यांच्या परिवाराकडून येणारी पत्रे हा मोठा आधार असतो. प्रत्येक सैनिकासाठी त्यांच्या घरचेच पत्र पाठवितात. त्यांचे मनोबल टिकून राहण्याच्या कामात ही पत्रे खूप महत्त्वाची ठरतात. त्यामुळे या पत्रांचाच आधार घेऊन आपल्या भावना सैनिकांपर्यंत पोहोचवाव्यात. त्यांच्याशी समाजानेही भावनिक नाते निर्माण करणे आम्हाला महत्वाचे वाटते. सगळा देश तुमच्या पाठीशी आहे, हा संदेश त्यांना द्यावा या उद्देशाने हा अनोखा पत्र उपक्रम राबवण्यात आला,’ असे डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी सांगितले.

या उपक्रमात बाळासाहेब शिंदे, राजेंद्र बा. खेडेकर, रमेश सूर्यवंशी, नरेश भगाडे, नरेंद्र सुर्वे, अमित साळुंके, संजय साळुंके, राजेंद्र गंगावणे, नंदकुमार खेडेकर, रोहिदास जाधव, स्वप्निल गंगावणे, अनिकेत गिते, स्वप्निल जोशी, सोमनाथ घोडके, संजय लोखंडे, राजेंद्र खेडेकर, रोहित साळुंके, अजिंक्य गंगावणे, ओमकार सुर्वे आदी नागरिकांनी भाग घेतला. 


(डॉ. नंदकिशोर एकबोटे यांच्या राखी उपक्रमाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search