Next
‘लेनदेन क्लब’चा एक लाख सदस्यांचा टप्पा पार
प्रेस रिलीज
Tuesday, March 12, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : लेनेदेन क्लब या भारतातील जलदगतीने विकसित होत असलेल्या पीटूपी कर्ज सुविधा देणाऱ्या व्यासपीठाने एक लाखांपेक्षा जास्त कर्जदार आणि कर्जदात्यांचा आकडा पार केला आहे. कंपनीने नवीन बाजार ट्रेंड्सशी समतोल साधून हा मैलाचा दगड पार केला आहे.

जून २०१८मध्ये सादर केलेल्या इन्स्टामनी या उत्पादनाच्या वापरात त्यांना वाढ दिसून आली आहे. सफाईदार कर्ज मंजुरी आणि वितरण प्रक्रिया हे इन्स्टामनीच्या लोकप्रियतेचे कारण आहे. त्याला कर्जदारांकडून चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षात टिअर टू आणि टिअर थ्री शहरांकडून कंपनीला अधिक प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत नवीन कर्ज सेवांमध्ये कमीत कमी ५० नवीन शहरे सामावून घेण्याची ‘लेनदेन क्लब’ची योजना आहे. सध्या त्यांच्या यादीत सर्वाधिक कर्जदात्यांच्या संख्येसह मुंबई अव्वल स्थानी आहे. त्या पाठोपाठ बंगळूर आणि हैदराबादचा क्रमांक आहे. एकूण कर्जदात्यांपैकी ६० टक्के कर्जदाते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील आहेत.

‘लेनदेन क्लब’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्हणाले, ‘एक लाखापेक्षा मोठा यूझरबेस मिळवणे ही ‘लेनदेन क्लब’ची मोठी सिद्धीच म्हटली पाहिजे. यामुळे आम्हाला भारतातील आर्थिक सेवा क्षेत्रात परिवर्तन करण्याच्या आमच्या प्रवासात दृढ राहण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. लघु उद्योगांशिवाय नोकरदार वर्गातील कर्जदारांसाठी आणखी उत्पादने सुरू करण्याच्या शक्यता आम्ही तपासात आहोत. येत्या काळात सर्वात जलद कर्जदाता आणि सर्वात विश्वसनीय गुंतवणूक मंच बनण्याची आमची इच्छा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link