Next
‘समाजाच्या कल्याणासाठी अखंड चिंतन व्हावे’
‘ब्राह्मण महासंघा’तर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Monday, October 29, 2018 | 04:48 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘आजवर ब्राह्मण समाजाने स्वतःचे कुटुंब, स्वतःचे सुख याचा कधीच प्राधान्याने विचार केला नाही. आपला जन्म समाजसेवेसाठी झाला आहे, या भावनेतून समाज काम करत आला. आपल्यातील अनेकजण वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये, विभिन्न पदावर कार्यरत आहेत. जीवनशैली, वेशभूषा बदलत आहे; परंतु आपला ‘डीएनए’ एकच आहे. त्यामुळे समाजाच्या कल्याणासाठी आपले चिंतन सुरूच राहील,’ असे प्रतिपादन परमपूज्य स्वामी श्री गोविंदगिरी महाराज यांनी केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व केलेल्या उद्योजकांना गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मराठी अभिनेते अनंत जोग, गायिका वैशाली सामंत, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, अभि ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योग विकास आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, प्रवक्ता संदीप खर्डेकर व जिल्हाध्यक्ष आनंद दवे आदी मान्यवर उपस्थित होते.

चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक अशोक देशपांडे यांना ‘उद्योगरत्न’, तर रेणुका शुगर्सच्या संस्थपिका विद्या मुरकुंबी व कॅनीन फाउंडेशनचे रामनाचार्य हैद्राबाद यांना ‘उद्योगभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनेते अनंत जोग व गायिका वैशाली सामंत यांना ‘कलाविष्कार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराज म्हणाले, ‘विश्वाचे कल्याण करायचे असेल, तर ब्राह्मण समाजाने सदैव जागरूक असायला हवे. आपण सर्व या राष्ट्राचे पालक आहोत. अखिल भारतीय महासंघातर्फे दर वर्षी पुरस्कार दिले जातात. समाजातील आदर्श व्यक्तींना गौरविण्याचे संघाचे हे काम प्रेरणादायी आहे. ब्राह्मण समाजाचे जीवन धार्मिक तत्त्वांवर आधारलेले आहे. तत्त्वमय, ज्ञानमय गुणांचा उपयोग उद्योग क्षेत्रामध्ये करायला हवा. आजच्या तरुणांनी उद्योग क्षेत्रात उतरणे महत्त्वाचे आहे.’

दुपारच्या सत्रात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी ‘संघटनेचे फायदे’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची परंपरा लाभली आहे. संघटन उभे करताना विचारांचा पाया मजबूत असायला हवा. चांगल्या योजना राबवायच्या असतील, तर त्याकडे मोहीम म्हणून पाहायला हवे. तात्विक आधार व नि:स्वार्थी भावनेने काम करणारी ही संघटना आहे.’

मुरकुंबी म्हणाल्या, ‘पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सहनशीलता व चिकाटी जास्त असते. मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले; परंतु आपल्याच समुदायातील माणसांकडून विशेषतः गुरुजींच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला याचा मला विशेष आनंद झाला आहे. खऱ्या अर्थाने आज काहीतरी समाजउपयोगी काम केल्यासारखे वाटते.’

देशपांडे यांनी उद्योग करताना आर्थिक भांडवल महत्त्वापेक्षा तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असायला हवी, तरच आपण व्यवसायात प्रगती करू शकत असल्याचे नमूद केले.

वैशाली सामंत यांनी सावरकरांच्या गीताने महोत्सवाची सांगता केली. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचलन स्वप्नील जोशी यांनी केले. आनंद दवे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search