Next
‘लहुजी वस्ताद स्वातंत्र्यसंग्रामाचे उद्गाते’
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 11:37 AM
15 0 0
Share this story

लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे पोस्टर व टीजर प्रदर्शित करताना डावीकडून अशोक लोखंडे, गिरीश परदेशी, शंकर भडकवाड, स्वाती लोखंडे, दादा पासलकर, कृष्णचंद्र ठाकूर, प्रा. सुधाकरराव जाधवर, वैभव शिरोळे, रोहित शिंदे आदी.

पुणे : ‘छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्याचे आणि क्रांतीचे उद्गाते आहेत. त्यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्यासह इतर अनेक महापुरुषांना घडवणाऱ्या लहुजी साळवे यांच्या चित्रपटासाठी प्रत्येकाने लोकवर्गणी द्यायला हवी. त्यांचे कार्य समजून घेऊन समाजापर्यंत आपला इतिहास पोहोचवला पाहिजे,’ असे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे समन्वयक आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. शिवाजी दळणर यांनी केले.

आलवसा फाउंडेशन व ऐसपैस निर्मिती यांच्या वतीने आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या टीजर व पोस्टरचे लोकार्पण ११ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात रंगलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, मध्यप्रदेशातील राज्यमंत्री कृष्णचंद्र ठाकूर (सिसोदिया), नऱ्हे येथील जाधवर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. सुधाकरराव जाधवर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभिनेते गिरीश परदेशी, नगरसेविका स्वाती लोखंडे, लहुजी वस्ताद स्मारकाचे अशोक लोखंडे, आलवसा फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर भडकवाड व ऐसपैस निर्मितीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर वैभव शिरोळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनेक दानशूरांनी चित्रपट निर्मितीसाठी देणगी दिली.

प्रा. दळणर म्हणाले, ‘ज्या लहुजी साळवे यांनी क्रांतीची ज्योत पेटवून पुण्यात अनेक क्रांतिकारक घडवले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना सरंक्षण देऊन शिक्षण प्रसार सोयीचा केला. त्यांच्यामुळेच आज मुली शिकताहेत, हे आपण विसरता कामा नये. त्यांच्यावरील चित्रपट समाजाने बनवावा. प्रत्येकाने यामध्ये योगदान द्यावे. अधिकाधिक लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.’

बागवे म्हणाले, ‘पवित्र आणि उदात्त हेतूने प्रेरित होऊन हा चित्रपट तयार होत आहे. यामुळे सामाजिक चळवळीला बळ मिळेल. एवढी महान व्यक्ती होऊनही लहुजी साळवे यांचा इतिहास लिहिला गेला नाही, ही शोकांतिका आहे. अनेक महान क्रांतीकारकांचे ते गुरू होते. खऱ्या अर्थाने साळवे ‘फादर ऑफ नेशन’ होते. त्यांच्यावरील या चित्रपटासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा.’

प्रा. डॉ. जाधवर म्हणाले, ‘आपले पूर्वज फार मोठे होते, हे मातंग समाजाने समजून घ्यावे. शिवाजी महाराजांकडे लहुजी वस्ताद यांचे आजोबा लहुजी मांग कार्यरत होते. तोच वारसा लहुजी वस्तादांनी पुढे चालवला. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके असे महान क्रांतिकारक त्यांनी घडवले. फुले दाम्पत्याला संरक्षण देऊन त्यांनी शिक्षणाची गंगा वंचितांपर्यंत पोहोचवली.’

पासलकर म्हणाले, ‘लहुजी वस्तादांवरील हा सिनेमा आपला आहे, या भावनेने प्रत्येकाने काम करावे. यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया वर्गणी द्यावी. कारण लोकवर्गणीतून उभारलेले कार्य चिरंतर राहते. लहुजी वस्तादांचे कार्य आणि ख्याती चिरंतर आहे.’

प्रास्ताविक करताना शंकर भडकवाड म्हणाले, ‘लहूजी वस्ताद यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्यावरील हा चित्रपट तयार केला जात आहे. पुढील वर्षी लहुजी वस्ताद यांच्या जयंतीदिनी (१४ नोव्हेंबर २०१९) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.’

कलादिग्दर्शक संतोष संकर, अशोक लोखंडे यांनी मनोगते व्यक्त केली. सोमनाथ देवकाते यांनी प्रास्ताविक केले. दत्ता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
AFSAR KHAN About 98 Days ago
Greate job Dostanno Keep it up
1
0

Select Language
Share Link