Next
‘ब्रिजलॅब्ज’तर्फे तीन हजार अभियंत्यांची भरती
प्रेस रिलीज
Thursday, April 11, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘ब्रिजलॅब्स सोल्युशन्स’तर्फे या आर्थिक वर्षात देशभरातील ५०० कंपन्यांमध्ये तीन हजार अभियंत्यांना नोकरी देण्यात येणार आहे. देशभरात भरती करण्याची ही मोहीम कंपनी ५०० संस्थांच्या मार्फत चालवणार आहे. यामध्ये १००हून अधिक वर्तमान आणि ४०० नवीन लहान-मोठ्या भागीदार कंपन्या सामील आहेत.

‘ब्रिजलॅब्स’मार्फत मेकर प्रोग्रामच्या माध्यमातून कंपन्यांना प्रशिक्षित अभियंते पुरविण्यासह अभियंत्यांना रोजगाराची सुरक्षा आणि उद्योग-विशिष्ट कौशल्ये प्रदान केली जातात. भागीदार कंपन्यांद्वारे पैसे भरले जाणारा मेकर प्रोग्राम उगवत्या तंत्रज्ञान क्षेत्रात पदार्पण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या अभियंत्यांसाठी एक बूट कॅम्प म्हणून काम करतो.

या विषयी बोलताना ‘ब्रिजलॅब्स’चे संस्थापक नारायण महादेवन म्हणाले, ‘अभियंत्यांना व्यावसायिक जगात आवश्यक असलेला प्रायोगिक अनुभव देऊन आपल्या देशातील कौशल्याची दरी भरून काढण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. उत्पादन विकासासाठी उपलब्ध तंत्रज्ञान-प्रतिभावंतांची संख्या आम्ही वाढवत असल्याचा ‘ब्रिजलॅब्स’ला अभिमान आहे. या तंत्रज्ञान क्षेत्रात तीन हजार अभियंत्यांना नोकरीपात्र बनवून येत्या वर्षात ‘ब्रिजलॅब्स’ त्यांच्या संख्येत सुमारे ५-१० टक्के भर घालेल. त्यांना आमच्या उत्तमोत्तम भागीदार कंपन्यांमध्ये नोकरी दिल्याने या अभियंत्यांना त्यांच्या सुफल भावी कारकीर्दीसाठी त्यांचे व्यावसायिक कौशल्य वापरण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी योग्य वातावरण प्राप्त होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search