Next
‘जेएसडब्ल्यू ग्रुप’चा फर्निचर व्यवसायात प्रवेश
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘जेएसडब्ल्यू’ समूहाने ‘फॉर्मा’ हा फर्निचर ब्रँड दाखल करीत भारतातील फर्निचर बाजारपेठेत प्रवेश केला. हा व्यावसायिक प्रवेश म्हणजे विविध ग्राहक केंद्रित व्यवसायात उतरण्याच्या जेएसडब्ल्यू समूहाच्या योजनेचा एक भाग आहे. ‘फॉर्मा’ दाखल झाल्यामुळे गेल्या पाच वर्षांत सुमारे ११ टक्के सीएजीआर नोंदविणाऱ्या, भारतातील फर्निचर बाजाराच्या प्रचंड वाढीच्या क्षमतेच्या संधीचा लाभ घेण्यासाठी, पायाभूत सुविधा क्षेत्रातील हा समूह सक्षम होईल. 

‘फॉर्मा’ हा जेएसडब्ल्यू लिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेडचा फर्निचर ब्रँड म्हणून दाखल झाला आहे. मोठी संख्या असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी चांगले डिझाइन देण्यासाठी दीर्घकालीन आणि टिकाऊपणावर संपूर्ण भर दिला आहे. बाजाराच्या एका व्यापक संशोधनाच्या आधारे भारतीय ग्राहकांसाठी अनुकूल श्रेणी ‘फॉर्मा’ने विकसित केल्या आहेत.  

या संदर्भात बोलताना ‘जेएसडब्ल्यू लिव्हिंग’च्या व्यवस्थापकीय संचालिका तारिणी जिंदाल हांडा म्हणाल्या, ‘आम्ही आता शिकत आहोत आणि खूप अंतर अजून पार करायचे आहे. नवीन उत्पादन आणि पर्याय देऊन भारतीयांना मदत करण्याचा विश्वास घेऊन आम्ही एक छोटीसी सुरुवात केली आहे. अद्वितीय डिझाइन बनविण्यासाठी आमची टीम, तसेच देशातील आणि परदेशातील डिझायनर्स घेऊन आम्ही काम करीत आहोत. ‘फॉर्मा’च्या माध्यमातून आम्ही भारतातील समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत चांगले डिझाइन पोहोचवू.’

‘जेएसडब्ल्यू लिव्हिंग’चे सीईओ बेदराज त्रिपाठी म्हणाले, ‘डिझाइन उपलब्ध करतानाच, भारताच्या प्रत्येक भागात पोहोचणे आणि अग्रस्थानी भारतीय वापरकर्त्यांना आणणे आवश्यक आहे. त्यामुळे आमचा स्पर्श होणाऱ्या प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात प्रवेश करण्यास ‘फॉर्मा’ टीमला बळ मिळेल. या व्यवसायात अन्य कोणापेक्षा अतिशय वेगाने आपला विस्तार करणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search