Next
पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे आवाहन
जागतिक वारसा दिनानिमित्त इतिहास प्रेमीमंडळाची मागणी
BOI
Thursday, April 18, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:


पुणे : जागतिक वारसा दिनाचे (१८ एप्रिल) औचित्य साधून, इतिहास प्रेमी मंडळाने पुणे शहरातील हजारो वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आवाहन शासनाला आणि समाजाला केले आहे. 

पुणे शहरातील वारसा जतन व संवर्धनासाठी वारसा तज्ञांची सल्लगार समिती निर्माण करावी. पुण्यातील नागेश्वर, केदारेश्वर, त्रिशुंड गणपती, जुना काळ भैरवनाथ अशा मंदिरांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष द्यावे. शनिवार वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, शिंदे छत्री अशा प्रदर्शनीय वास्तूंची देश विदेशात जाहिरात करून पर्यटकांचे लक्ष वेधून घ्यावे. त्यांच्यासाठी विविध भाषांमधील माहितीपत्रके व गाईड उपलब्ध करून द्यावेत.


पुण्यात विविध विषयांशी संबंधीत २५ ते ३० संग्रहालये आहेत. त्यांना भेट देऊ इच्छिणाऱ्यांसाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करावे. पुण्याच्या कसबा पेठेत हिस्सार किल्ला व गावकुसाच्या तटबंदीचे आवशेष शिल्लक आहेत. त्याचे रक्षण करावे. पुणे शहरात अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक, साहित्यिक, कलाकार, खेळाडू होऊन गेले. त्यांच्या निवासस्थानावर कायमस्वरूपी माहिती फलक लावावेत. भौगोलिक वैशिष्ट्ये व वनस्पतींची विविधता जपावी. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था हेही पुण्याचे वैभव आहे. सामान्य लोकांना अशा संस्थांची माहिती व्हावी म्हणून ‘वारसा दर्शन सप्ताह’सारखे कार्यक्रम आयोजित करावेत. पर्यटन व्यवसायास चालना देण्यासाठी विविध हॉटेलांमध्ये माहितीपत्रके ठेवावीत. अशा मागण्या मंडळाने मांडल्या आहेत.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search