Next
विदर्भ, मराठवाड्यातून ‘राष्ट्रवादी’कडून अर्ज दाखल
प्रेस रिलीज
Wednesday, March 27, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात केली असून, २६ मार्चला पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या वेळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भंडारा-गोंदियाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी २५ मार्चला बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार राणा जगजितसिंह पाटील, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश वीटेकर आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी २६ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search