Next
‘नुव्होको’ला पुरस्कार
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 04:51 PM
15 0 0
Share this story

पुरस्कार स्वीकारताना ‘नुव्होको’चे ह्युमन रिसोर्सेस अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स विभागाचे प्रमुख देवेंद्र शांगरी आणि कॉर्पोरेट एचआर विभागप्रमुख मनिषा केळकर.

पुणे : देशातील बांधकाम साहित्याची आघाडीची उत्पादक व रिटेलर असलेल्या ‘नुव्होको व्हिस्टास कॉर्पोरेशन लिमिटेड’ (पूर्वीची लाफार्ज इंडिया लिमिटेड) या कंपनीला भारताच्या पहिल्या ‘पीपल कॅपिटल इंडेक्स’ (पीसीआय) यादीतील आघाडीच्या ५० कंपन्यांत समावेश झाल्याबद्दल नुकतेच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बुद्धिमत्ता विकास प्रयत्न व कार्यक्रमांत आपल्या कर्मचाऱ्यांना अत्यंत संतुष्ट राखणारी तसेच प्रागतिक मनुष्यबळ धोरणे राबवणारी ‘नुव्होको’ ही या यादीत मानांकन मिळवणारी बांधकाम साहित्य क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे. मुंबईत झालेल्या ‘लीडिंग फ्रॉम बिहाईंड’ या एचआर लीडरशिप परिषदेत यादीतील सर्व विजेत्या कंपन्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘नुव्होको’चे ह्युमन रिसोर्सेस अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स विभागाचे प्रमुख देवेंद्र शांगरी आणि कॉर्पोरेट एचआर विभागप्रमुख मनिषा केळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link