Next
रत्नागिरीत १३ जुलैला रंगणार ‘नृत्यार्पण‘ नृत्याविष्कार
BOI
Wednesday, July 10, 2019 | 12:42 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील साईश्री नृत्य कलामंदिरतर्फे ‘नृत्यार्पण’ हा भरतनाट्यम नृत्याविष्कार १३ जुलैला माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी आकाशवाणीचे प्रमुख श्रीनिवास जरंडीकर अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे, डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित राहणार आहेत. साईश्री नृत्य कलामंदिर ही संस्था गेली २१ वर्षे रत्नागिरीत भरतनाट्यम् नृत्याचे वर्ग घेत आहेत. दोन मुलींपासून सुरुवात झालेल्या या नृत्यवर्गात सध्या १०० हून अधिक मुली नृत्याचे धडे गिरवत आहेत. या नृत्यवर्गातीलच श्रुती मलुष्टे, श्रुती डोंगरे, गायत्री देसाई, वैभवी पवार, मनाली मनवाडकर, मीरा खालगांवकर, शिवानी भोंगले, ईशा जोशी या मुली विशारद असून, त्या आज विविध ठिकाणी नृत्याचे क्लासेस घेत आहेत. या मुली ‘नृत्यार्पण’ हा नृत्याविष्कार सादर करणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीकरांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साईश्री नृत्य कलामंदिरच्या संचालिका मिताली भिडे यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, १३ जुलै २०१९
वेळ : सायंकाळी सहा वाजता 
स्थळ : जयेश मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search