Next
श्रीपाद र. जोशी, आसावरी काकडे
BOI
Tuesday, January 23, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

एकाहून एक सरस शब्दकोश लिहिताना विपुल लेखन करत दोनशेहून अधिक पुस्तकं लिहिणारे श्रीपाद रघुनाथ जोशी आणि मराठीइतकाच हिंदी काव्यलेखनाचा प्रांत गाजवणाऱ्या कवयित्री आसावरी काकडे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
श्रीपाद रघुनाथ जोशी

२३ जानेवारी १९२० रोजी जन्मलेले श्रीपाद रघुनाथ जोशी हे कथाकार, अनुवादक आणि कोशकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी विपुल लेखन केलं असून, जवळपास दोनशे पुस्तकं लिहिली आहेत. 

मराठी हिंदुस्तानी कोश, विद्यार्थी हिंदी-मराठी कोश, अभिनव शब्दकोश, उर्दू-मराठी शब्दकोश, उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश असे त्यांचे काही शब्दकोश गाजले होते.

अखेरचं पर्व, अनंता काय रे केलंस हे?, अबलांचे आसू, आनंदी गोपाळ, कस्तुरीचे कण, ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन, गांधीजी : एक झलक, गांधी जीवन प्रसंग, ग्यानबाचा गांधीबाबा, ग्रामीण विकासाची वाटचाल, चिनारच्या छायेत, चीनचे आक्रमण व गांधीवाद, जिब्रानच्या नीतिकथा, तुरुंगातले दिवस, देवाशपथ खरं सांगेन, पाथेय, महाराष्ट्राचे समाज सुधारक, मी पाहिलेले गांधीजी, मी भूमिपुत्र, मुस्लिम सण आणि संस्कार, रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र – अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२४ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 
..................

आसावरी काकडे 

२३ जानेवारी १९५० रोजी जन्मलेल्या आसावरी काकडे या मराठीबरोबरच हिंदीमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या कवयित्री आहेत. 

त्यांना महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार, मृण्मयी पुरस्कार, विशाखा पुरस्कार, हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार, गदिमा पुरस्कार न. चिं. केळकर पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, ग. ह. पाटील पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 

बोल माधवी, आरसा, आकाश, लाहो, मी एक दर्शनबिंदू, रहाटाला पुन्हा गती दिलीय मी, स्त्री असण्याला अर्थ, उत्तरार्ध, अनुमनु शिरू,  टिक टॉक, ट्रिंग, जंगल जंगल जंगलात काय?, भिंगोऱ्या भिंग, मौन क्षणों का अनुवाद, इसीलिये शायद, कवितेभोवतालचे आकाश, वस्यम इदं सर्वम : एक आकलन प्रवास – असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(आसावरी काकडे यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉम वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search