Next
शिष्या स्कूलतर्फे वार्षिक कला प्रदर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, November 14, 2018 | 01:21 PM
15 0 0
Share this article:



पुणे : वाकड येथील दी शिष्या स्कूलतर्फे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी शिष्या स्कूलचे संचालक सिद्धार्थ माहेश्‍वरी, मुख्याध्यापिका प्रियम गुंजाल, वरिष्ठ समन्वयक सौ. चॅटर्जी, इरा वाधवा आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी भारतातील वेगवेगळी राज्ये आणि त्यांची संस्कृती ही संकल्पना होती. शिष्या स्कूल हे इंटिग्रेटेड स्कूल असून, यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांसोबत विशेष मुले देखील शिक्षण घेतात.

या प्रसंगी बोलताना डॉ. पांडे म्हणाले, ‘जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे गरीबांपर्यंत शिक्षण पोहचत नसेल, तर शिक्षणाला गरीबांपर्यंत पोहचविले पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. या शाळेतील दिव्यांग व सामान्य मुलांना एकत्रित शिक्षण देण्याची संकल्पना खूपच वाखणण्याजोगी आहे. यामुळे दिव्यांग मुलांचा आत्मविश्‍वास वाढून त्यांना सामान्य मुलांप्रमाणे समाजात वावरण्यास मदत होते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search