Next
यंदाचा जनसेवा पुरस्कार सेवावर्धिनी संस्थेला
बुधवारी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
BOI
Monday, October 22 | 06:10 PM
15 0 0
Share this story

जनसेवा पुरस्कार वितरण समारंभाविषयी माहिती देताना (डावीकडून) विनायक जोशी,प्रदीप जगताप व किशोर घोळबा.

पुणे : ‘पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्युल्ड बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची बँक असलेल्या जनसेवा सहकारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी, २४ ऑक्टोबर रोजी जनसेवा पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचा जनसेवा पुरस्कार देशभरातील सेवाभावी संस्थांना मदत करणाऱ्या‘सेवावर्धिनी’ या संस्थेस देण्यात येणार असून, एक लाख एक हजार रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळा वानवडी येथील महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्राज इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित राहणार आहेत’, अशी माहिती जनसेवा सहकारी बँकेचे  अध्यक्ष सीए. प्रदीप जगताप, सरव्यवस्थापक घोळबा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी यांनी दिली. 

‘१९९८ पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिला पुरस्कार दादा किराड, प्रभाकर भट यांना देण्यात आला होता. आजपर्यंत १८ जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले असून, २०१६ मध्ये हा पुरस्कार रा. स्व. संघाच्या प्रेरणेने ग्रामविकासाचे प्रभावी कार्य करणाऱ्या  समराळा गावास देण्यात आला, तर गेल्या वर्षी हा पुरस्कार दिव्यांगाबाबतची जाणीव जागृती करणाऱ्या सक्षम(समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंसादन मंडळ) या संस्थेस देण्यात आला होता’, असेही या वेळी सांगण्यात आले.     
                                
‘हडपसरमधील मामासाहेब हजारे, आबनावे गुरूजी, रघुनाथ कचरे, मधुकरराव टेमगीरे, रामचंद्र मारुती रासकर आदी समविचारी कार्यकर्त्यांनी यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, सुरुवातीस भिशी मंडळ आणि नंतर १९७२ मध्ये ही स्वतंत्र बँक ‘जनसेवा सहकारी बँक’ नावाने  स्थापना केली. ‘बहुत जनांसी आधारु’ अशी प्रतिमा असणाऱ्या या बँकेच्या आज एकूण तीस शाखा असून, बँकेचा एकूण व्यवसाय तीन हजार ५१ कोटी एवढा झाला आहे. बँकेने स्वत: तयार केलेल्या सॉफ्टवेअरला आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. सामाजिक कार्यातही बँक नेहमी आघाडीवर असते’,अशी माहितीही  प्रदीप जगताप यांनी दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link