Next
रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
BOI
Monday, March 04, 2019 | 02:30 PM
15 0 0
Share this storyसोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक बनल्यामुळे या इमारतीचे तत्काळ स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नुकताच रुग्णकल्याण समिती व नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक समितीचे अध्यक्ष अतुल खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

रोपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत रुग्णकल्याण समिती व नियामक मंडळाची एकत्रित बैठक झाली. या वेळी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, महादेव पाटील, अंगद चिखलकर, शिवाजी चिखलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार सरडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम यशस्वी राबवल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या बैठकीत रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक झाल्यामुळे या इमारतीचे तत्काळ स्ट्रक्चर ऑडिटडीट करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. त्याबरोबरच भोसे येथील उपकेंद्राची इमारत नवीन बांधण्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा दुसरा ठराव घेण्यात आला. रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या बोगस डाक्टरांवर कारवाई करणे, बाभूळगाव व मेंढापूर येथील उपकेंद्राला स्वतंत्र पाणीपुरवठा करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपकेंद्रात राहणे, किशोरवयीन मुलींचा मेळावा घेण्याबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या नमुना तपासण्याबाबतचे ठराव घेण्यात आले.

या प्रसंगी सभापती पाटील म्हणाले, ‘आरोग्य कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे लक्षात आले असून, कोणी कर्मचारी जातीची अथवा संघटनेची भीती घालून कामचूकारपणा करीत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही.’

अध्यक्ष खरात यांनी पांढरेवाडी येथे आयुर्वेदिक दवाखाना मंजूर झाला असल्याचे सांगून रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्श बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी डॉ. सरडे यांनीही मनोगत व्यक्त केले.  

या वेळी विस्तार अधिकारी पी. आर. जावळे, औषध निर्माण अधिकारी एस. बी. हिरेमठ, आरोग्य सहाय्यक एम. एन. सुतार, एन. एम. गणपुले, कनिष्ठ लिपीक सतीश मचाले, लॅब टेक्निशियन अरविंद बागल, आरोग्य सहाय्यिका एम. जी. गायकवाड, श्रीमती ननवरे, बी. एन. वाघमारे, ए. टी. माने, यु. एन. गोरे, व्ही. डी. राऊत, एन. पी. गायकवाड, आर. एम. सुतार, बी. डी. शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link