Next
शहापूर युवक काँग्रेसतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
BOI
Wednesday, December 05 | 11:23 AM
15 0 0
Share this story



शहापूर : ठाणे जिल्हा ग्रामीणचे युवक अध्यक्ष सुशील सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश भोईर यांच्या पुढाकाराने शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील नूतन प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयात शहापूर युवक काँग्रेसच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा बालगट, किशोर गट व खुला गट अशा तीन गटांत घेण्यात आली.

या स्पर्धेत एकूण दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेदरम्यान शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी सभापती महेश धानके यांनी उपस्थिती लावली. आताच्या स्पर्धेच्या युगात ज्याच्याकडे कला आहे, तोच कसा टिकून राहील यावर धानके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांच्यासमवेत शहापूर शहर अध्यक्ष सुनील पानमंदे उपस्थित होते. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहापूर विधानसभा युवक अध्यक्ष अंकुश भोईर, ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष इम्रान शेख यांनी विशेष मेहनत घेतली. यासाठी त्यांना विद्यालयाच्या मुख्यध्यापिका मेघा जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कशिवले यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link