Next
महाराष्‍ट्राच्‍या रुग्‍णवाहिका प्रकल्‍पाला मिळणार जागतिक मान्‍यता
प्रेस रिलीज
Monday, February 25, 2019 | 11:19 AM
15 0 0
Share this article:पुणे : महाराष्‍ट्र इमर्जन्‍सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस-डायल १०८) या महाराष्‍ट्र सरकारच्‍या सार्वजनिक-खासगी भागीदारीमधील रुग्‍णवाहिका प्रकल्‍पाला डिजिटल आरोग्‍य उपक्रमांमधील सर्वोत्तम उपक्रम म्‍हणून २३ देशांसमोर सादर करण्‍यासाठी निवडण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जागतिक आरोग्‍य संघटनेने (डब्‍ल्‍यूएचओ) दिल्‍लीमध्‍ये २५ ते २७ फेब्रुवारी २०१९ दरम्‍यान चौथ्‍या ग्‍लोबल डिजिटल हेल्‍थ पार्टनरशीप (जीडीएचपी) समितीचे आयोजन केले आहे.

‘जीडीएचपी’चे हे चौथे पर्व आहे आणि भारतात पहिल्‍यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पहिले तीन पर्व ऑस्‍ट्रेलियामधील कॅनबेरा, ‘यूएस’मधील वॉशिंग्‍टन डीसी आणि ‘युके’मधील लंडन येथे आयोजित केले होते. २३ देशांमधील सरकारी प्रतिनीधी ‘जीडीएचपी’ला उपस्थित असतात. सदस्‍यीय देश डेटा व तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या हेल्‍थकेअरमधील सर्वोत्तम उपक्रमांबाबत चर्चा करण्‍यासोबत त्‍याबाबत माहिती सांगतात आणि त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये त्‍यांची अंमलबजावणी करण्‍यासाठी तंत्रज्ञान माहितीदेखील सांगतात.

‘एमईएमएस-डायल १०८’ हा राज्य सरकारच्‍या आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभागाचा अद्वितीय आपत्‍कालीन वैद्यकीय रुग्‍णवाहिका प्रकल्‍प आहे. राज्‍यामध्‍ये असलेल्‍या ९३७ पूर्णपणे सुसज्‍ज वैद्यकीय रुग्‍णवाहिकांच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून सरकार सर्व नागरिकांना कोणत्‍याही वैद्यकीय आपत्‍कालीन स्थितीमध्‍ये मोफत वैद्यकीय केअर सुविधा देतात. सर्व नागरिकांसाठी रुग्‍णवाहिका मोफत उपलब्‍ध आहेत. महाराष्‍ट्रातील नागरिक या सेवेचा लाभ घेण्‍यासाठी कोणताही मोबाइल किंवा लँडलाइनवरून ‘१०८’ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. राज्य सरकारसाठी पुण्‍यातील ‘बीव्‍हीजी इंडिया लिमिटेड’ आणि लंडनमधील ‘यूकेएसएएस’ हे ‘एमईएमएस’चे अंमलबजावणी भागीदार आहेत.

‘बीव्‍हीजी’ ही भारतातील एकीकृत सेवांची प्रमुख व आघाडीची कंपनी आहे. ‘बीव्‍हीजी’चा पुण्‍यामध्‍ये अत्‍याधुनिक नियंत्रण कक्षदेखील आहे. हा नियंत्रण कक्ष महाराष्‍ट्रातील सर्व कॉल्‍सना २४x७ तास सेवा देतो. कॉल घेणारे तज्ज्ञ आपत्‍कालीन स्थिती जाणून घेत रुग्‍णाला रुग्‍णवाहिकेतील डॉक्‍टरांशी जोडून देतात आणि रुग्‍णाच्‍या मदतीसाठी जवळच्‍या स्‍थानापासून रुग्‍णवाहिका पाठवतात. राज्‍यातील सर्व शहरी, ग्रामीण व दूरस्‍थ भागांसाठी ‘१०८’ आपत्‍कालीन सेवा कार्यरत आहे आणि ही सेवा प्रशिक्षित व तज्‍ज्ञ टीमसह सुसज्‍ज आहे. ‘बीव्‍हीजी’सोबतच्‍या सहयोगाने या प्रकल्‍पाची अंमलबजावणी करण्‍यामध्‍ये आंध्रप्रदेश हे महाराष्‍ट्रानंतर दुसरे राज्‍य आहे. २०१७मध्‍ये आंध्रप्रदेशात या प्रकल्‍पाची सुरुवात झाली. ‘बीव्‍हीजी’ने राज्‍याची राजधानी अमरावती येथेदेखील अत्‍याधुनिक नियंत्रण कक्ष स्‍थापित केले आहे. महाराष्‍ट्र हे त्‍याची यशस्‍वीगाथा दाखवण्‍यासाठी भारतातील एकमेव राज्‍य ठरले आहे. ‘१०८’ रुग्‍णवाहिका सेवा यंत्रणा संपूर्ण भारतभरात कार्यरत असून, सर्व राज्‍य सरकारने या प्रकल्‍पाची अंमलबजावणी केली आहे.

या विकासाबाबत बोलताना ‘बीव्‍हीजी’चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक (सीएमडी) हणमंतराव गायकवाड म्‍हणाले, ‘महाराष्‍ट्र व भारतासाठी हा अभिमानास्‍पद क्षण आहे. जागतिक आरोग्‍य संघटना व केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने इतर देशांसमोर यशस्‍वीगाथा दाखवण्‍यासाठी ‘एमईएमएस’सारख्‍या स्‍वदेशी सार्वजनिक सेवा प्रकल्‍पाची निवड केली आहे. मला खात्री आहे की, आपत्‍कालीन रुग्‍णवाहिका सेवा चालवण्‍याचे आमचे प्रयत्‍न इतर देशांसाठी हीच सेवा सुरू करण्‍यासाठी अत्‍यंत लाभदायी ठरतील.’

महाराष्‍ट्रात जानेवारी २०१४मध्‍ये सुरू झालेल्‍या ‘एमईएमएस’ला १.५४ कोटी कॉल्‍स केले आहेत आणि या प्रकल्‍पाने आतापर्यंत ३७ लाख आपत्‍कालीन रुग्‍णांना सेवा दिली आहे. या आपत्‍कालीन स्थितींमध्‍ये तीन लाखांहून अधिक वाहन अपघाताच्‍या घटना आणि जवळपास तीन लाख गरोदरपणासंबंधित घटनांचा समावेश आहे. जवळपास ३० हजार मुलांचा जन्‍म रुग्‍णवाहिकांमध्‍ये झाला आहे.
 
‘जगभरात आपत्‍कालीन वैद्यकीय केअर सेवा अत्‍यंत महत्त्वाची आहे. ‘एमईएमएस’ सेवा सर्व पातळ्यांपर्यंत पोहोचली आहे, जी आता रुग्‍णवाहिकेच्‍या माध्‍यमातून आपत्‍कालीन वैद्यकीय स्थितीमध्‍ये लक्षणीय सेवा देऊ शकते. आपत्‍कालीन वैद्यकीय सेवेची खासियत म्‍हणजे ‘गोल्‍डन आवर’मध्‍ये म्‍हणजेच आपत्‍कालीन वैद्यकीय सेवेसाठी कॉल आल्‍यानंतर पहिल्‍या ६० मिनिटांमध्‍येच मेडिकल केअर सेवा उपलब्‍ध करून दिली जाते. ‘एमईएमएस’मध्‍ये आम्‍ही आता कॉल मिळाल्‍यानंतर शहरी भागांमध्‍ये सरासरी १८ मिनिटांमध्‍ये आणि ग्रामीण भागांमध्‍ये सरासरी २२ मिनिटांमध्‍ये आपत्‍कालीन रुग्‍णांपर्यंत पोहोचत आहोत,’ अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

‘एमईएमएस’चे हे प्रयत्‍न सहभागी देशांसाठी अत्‍यंत साह्यभूत ठरतील. सहभागी देशांमध्‍ये अर्जेन्टिना, ऑस्‍ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, कॅनडा, एस्टोनिया, हॉंगकॉंग एसएआर, भारत, जपान, रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया, इटली, न्‍यूझीलंड, नेदरलँड्स, किंग्‍डम ऑफ सौदी अरेबिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया, स्वित्‍झर्लंड, स्‍वीडन, पोर्तुगाल, युनायटेड किंग्‍डम, उक्रेन, उरूग्‍वे या देशांसह जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या सदस्‍यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search