Next
‘लायन्स क्लब’तर्फे गृहपयोगी साहित्याचे वाटप
प्रेस रिलीज
Monday, October 29, 2018 | 04:25 PM
15 0 0
Share this storyपुणे : दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ डी २ आणि लायन्स क्लब्ज इंटरनॅशलन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दांडेकर पूल येथील कालवा फुटीतील १०० बाधित कुटुंबियांना गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये भांडी, अन्नधान्य, कपडे, दिवाळी फराळाच्या वस्तू, तेल, साबण, गणपतीची मूर्ती आदी वस्तूंचा समावेश आहे.

महर्षीनगर येथील महावीर प्रतिष्ठानच्या सभागृहात हा  साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. १० लाखांच्या खर्चातून हे साहित्य देण्यात आले आहे. या वेळी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २चे प्रांतपाल लायन रमेश शहा, स्मिता शहा, माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन प्रेमचंद बाफना, लायन आनंद आंबेकर, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, दांडेकर पूल प्रभागातील नगरसेवक धीरज घाटे, लायन नितीन शहा, लायन प्रवीण खुळे, लायन सुनील सेठिया, लायन उत्तम बाठीया, लायन दीपा जवळेकर, लायन वीरेंद्र पटेल, लायन शरद पवार, लायन राजेंद्र गोयल, लायन तुषार मेहता, लायन शाम खंडेलवाल, लायन कांतीलाल ओसवाल, लायन भरत जैन, लायन दिपक सेठीया यांच्यासह लायन्सचे पदाधिकारी व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रांतपाल शहा म्हणाले, ‘एक महिन्यापूर्वी दांडेकर पूल येथील कालवा फुटल्याने जनता वसाहत भागात राहणाऱ्या अनेकांची घरे, संसार वाहून गेली. हातावर पोट असलेल्या या बांधवांना, माता-भगिनींना पाठबळ देण्यासाठी लायन्स क्लबचे सदस्य सरसावले. तात्काळ मदत केली; परंतु तेवढ्यावरच न थांबता एक टीम तयार करून या भागातील बाधित कुटुंबांची संपूर्ण माहिती संकलित करून गरजूंना संसाराला लागणारे सर्व साहित्य देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. फाउंडेशनकडून निधी आल्यानंतर घरासाठी लागणारे साहित्य, कपडे, भांङी महिलांसाठी साड्या, फराळाच्या वस्तू, ब्लॅंकेट आदी वस्तू देण्यात आल्या. भविषयातही लागेल ती मदत केली जाईल.’

बाफना म्हणाले, ‘प्रत्येक आपत्तीजन्य परिस्थितीत लायन्स क्लबने उल्लेखनीय काम केले आहे. आज या कुटुंबाना गृहपोयोगी वस्तू मिळाल्याने मोठा आधार झाला आहे. यांची दिवाळी सगळ्यांसारखी आनंदात जाईल. वस्तीत राहणाऱ्या लोकांनी तरुणांच्या साथीने मदत गट तयार करावेत. त्यामुळे वस्तीतील समस्या सोडविण्यास मदत होऊ शकेल.’

भिमाले म्हणाले, ‘कालवा फुटल्यानंतर पालिकेसह सगळ्यांनीच तातडीने मदतीचे हात पुढे केले. या कुटुंबाना धीर देण्याचा प्रयत्न केला. लायन्स क्लबने या कुटुंबाना केलेली मदत म्हणजे दिवाळीची भेट आहे.’

घाटे म्हणाले, ‘लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या भागात फिरून पाहणी केली. योग्य गरजवंतांपर्यंत ती मदत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती लायन्स क्लबच्या   सभासदांमध्ये पाहायला मिळाली.’

आनंद आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link