Next
डॉ. दामले यांच्या प्रकल्पाची अमेरिकन कॉन्स्युलेटकडून निवड
प्रेस रिलीज
Wednesday, December 13, 2017 | 02:55 PM
15 0 0
Share this article:

डॉ. बाळकृष्ण दामलेपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'एज्युकेशन मल्टिमिडिया रिसर्च सेंटर' (ईएमआरसी)चे प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण दामले यांच्या  'लर्निंग डिझाईन ऑफ ई-कन्टेन्ट' या प्रकल्पाची युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेटकडून निवड झाली आहे. 

युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेटच्या 'एक्स्चेंज एम्बॅसेडर प्रोग्रॅम' अंतर्गत ही निवड झाली आहे. त्यानुसार डॉ. दामले  हे भारतातील महाविद्यालये, विद्यापीठातील प्राध्यापक व शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापनात दृक्-श्राव्य माध्यमांच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन करतील. भारतात विविध ठिकाणी याबाबत प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
 
डॉ. दामले हे फुलब्राईट स्कॉलर असून ई-कन्टेन्ट निर्मितीसाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत चार वेळा राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे. 'अध्यापनात नाट्य आणि चित्रफितींचा वापर' या त्यांच्या संशोधन निबंधाला हार्वर्ड युनिव्हर्सिटीने गौरविले आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search