Next
फुलवडे गावात मोफत आरोग्य शिबिर
BOI
Wednesday, September 11, 2019 | 02:38 PM
15 0 0
Share this article:



आंबेगाव :
पावसाळ्यात आदिवासी भागात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. या पार्श्वभूमीवर फुलवडे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘नीमा वुमन्स फोरम’ची पिंपरी-चिंचवड शाखा आणि किसान सभा, आंबेगाव तालुका समिती यांच्या वतीने आठ सप्टेंबर रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १००हून अधिक रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. रुग्णांची शुगर व बीपी तपासणी करण्यात आली. 

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रज्ञा खोसे (अध्यक्ष, निमा वुमन्स फोरम, पिंपरी-चिंचवड शाखा) यांनी आपल्या मनोगतात उत्तम आरोग्यासाठी उपस्थित रुग्णांना व ग्रामस्थांना अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या शिबिरात एक चिंताजनक बाब समोर आली. एकूण रुग्णांपैकी सुमारे ७० टक्के रुग्णांना शुगर व बीपी विकारांचा त्रास आढळून आला. अनेकांना मधुमेह झाल्याचे या शिबिरातील तपासणीनंतरच कळले.



या शिबिरात डॉ. प्रज्ञा खोसे, डॉ. कल्पना एरंडे डॉ. मयुरी मोरे, डॉ. जबीन पठाण या डॉक्टरांनी सहभागी होऊन रुग्णांची तपासणी केली. याबरोबरच अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सताई सीमा उघडे, अलका मुंडे, आशा वर्कर फसाबाई मोहरे व एम. आर युनियनचे निरंजन थिटे, अक्षय केदार, शुभम आव्हाड यांनी त्यांना साह्य केले. 

शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक मनोहर मोहरे यांनी केले. प्रास्ताविक किसान सभेचे राजू घोडे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते मोहन नंदकर व अमोल वाघमारे यांनी या आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या. आभारप्रदर्शन अशोक पेकारी यांनी केले. 



या वेळी फुलवडे गावाच्या सरपंच मनीषा नंदकर, गणेश काटळे (सचिव, डीवायएफआय संघटना), फुलवडे गावचे पोलीस पाटील शरदचंद्र मोहरे, संदीपशेठ नंदकर, माजी उपसरपंच विजय गभाले, दुलाजी मोहरे, बाळासाहेब मोहरे, राहुल मोहरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. 

या शिबिराच्या स्थानिक संयोजनात अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत फुलवडे आणि फुलवडे येथील ध्यास बहुउद्देशीय कष्टकरी संस्था यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search