Next
‘व्यास क्रिएशन्स’तर्फे शिक्षक आणि खुल्या गटासाठी अभिवाचन स्पर्धा
राज्यव्यापी स्पर्धेतील सहभागासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
BOI
Tuesday, April 09, 2019 | 03:05 PM
15 0 0
Share this article:

ठाणे :  ठाण्यातील व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्था अभिनव उपक्रमांची जोड देत वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करीत असते. दर्जेदार साहित्याची वाचकांना ओळख व्हावी, या उद्देशाने व्यास क्रिएशन्सने आता पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा प्रामुख्याने आजी-माजी शिक्षकांसाठी, तसेच खुल्या गटासाठी घेण्यात येत आहे.

पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड उद्योगसमूह या स्पर्धेचा मुख्य प्रायोजक आहे. ही स्पर्धा जाहीर होताच राज्याच्या ३६ जिल्ह्यांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. परंतु शालेय परीक्षा, इतर उपक्रम यातील व्यग्रतेमुळे शिक्षकांच्या विनंतीनुसार या स्पर्धेची ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. स्पर्धकांना ऑनलाइन स्वरूपात आपले सादरीकरण पाठवता येणार आहे.

कोणत्याही पुस्तकातील उतारा किंवा पूर्वप्रकाशित कोणतेही साहित्य याचे वाचन करून त्याचा ऑडिओ-व्हिडिओ व्हॉट्सअॅहप, ई-मेल, सीडी यांपैकी एका माध्यमातून पाठवायचे आहे. ही स्पर्धा राज्याच्या सर्व जिल्ह्यांसाठी आहे. अभिवाचनाचा कालावधी तीन ते सात मिनिटांचा असावा. वाचिक अभिनयाच्या साथीने साहित्यातील नवरसांपैकी एकाचा अंतर्भाव साहित्य वाचनात असावा. वैयक्तिक किंवा सांघिक स्वरूपातही यात सहभाग घेता येईल. एका संघात जास्तीत जास्त चार वाचक असावेत. अभिवाचनासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतील उतारे स्वीकारण्यात येतील. प्रवेश विनामूल्य आहे, असे संस्थेतर्फे कळवण्यात आले आहे.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १० हजार, पाच हजार आणि तीन हजार रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आणि उत्तेजनार्थ दोन हजार रुपयांची एकूण १२ बक्षिसे देण्यात येतील. तसेच विजेत्या शिक्षकांच्या शाळेला पारितोषिकांच्या रकमेइतकी पुस्तके पुरस्कार स्वरूपात देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला ई-सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. 

एकाच वेळी शिक्षकांचा आणि शाळेचा सन्मान करणारी ही स्पर्धा आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पितांबरी उद्योग समूह आणि व्यास क्रिएशन्स या संस्थांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : (०२२) २५४४७०३८, ९९६७६ ३७२५५ 
वेबसाइट : http://vyascreations.in/
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search